मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

पश्चिम रेल्वे भरती ५७७५ जागांसाठी...

पश्चिम रेल्वे मुंबई विभागामध्ये गँगमन, ट्रॅकमन, हेल्पर, खलाशी, पोर्टर या पदांवरील ५७७५ जागांसाठी भरती होणार आहे.

वेतनश्रेणी - रू.५२०० - २०२०० ग्रेड पे रू. १८००

वयोमर्यादा - १८ ते ३३ वर्षे

शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण

निवडप्रक्रिया - अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षेसाठी बोलावले जाते. यानंतर शारीरिक क्षमता चाचणी व वैद्यकीय तपासणी केली जाते.

लेखी परीक्षेमध्ये १०० वस्तुनिष्ठ (बहुपर्यायी) प्रश्न विचारले जातात. यासाठी ९० मिनिटे कालावधी असतो. प्रश्न सामान्य ज्ञान, गणित, सामान्य विज्ञान व तर्कावर आधारित असतात. प्रश्नांचा स्तर दहावीपर्यंतचा असतो. प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू व गुजराती भाषेत असतील. चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जातील.

शारीरिक क्षमता चाचणी - पुरुष उमेदवारांनी एकाच प्रयत्नामध्ये १ कि.मी. अंतर ४ मिनिटे व १५ सेकंदामध्ये धावले पाहिजे तर स्त्री उमेदवारांनी एकाच प्रयत्नामध्ये ४०० मी. अंतर ३ मिनिटे व १०

प्रवेश अर्जाचा नमुना एम्प्लॉयमेंट न्यूज (दिनांक ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१३) मध्ये उपलब्ध आहे

किंवा  http://www.rrc-wr.com/ वेबसाईटवरून ही डाऊनलोड करून घेता येईल. परीक्षा फी रू १००/- आहे.

प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख - १४ जानेवारी २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा