बुधवार, २२ एप्रिल, २०१५

हॉट समर कूल स्टायलिंग

हॉट समर कूल स्टायलिंग

vv18नेहमीची जाडजूड जीन्स नको वाटतेय? सनकोट किती 'ओल्ड फॅशन' दिसतोय पण पर्याय काय? सनग्लासेसची लेटेस्ट स्टाइल कोणती? उन्हापासून बचाव तर हवा पण स्टाइल भी चाहिये बॉस! समर स्टायलिंगचे कूल फंडे...
'काय उन्हाळा आहे यार! ही जीन्स नको वाटतेय अगदी. पण रोज सलवार कमीज घालून तर नाही ना बाहेर जाऊ शकत.. सवयच नाही तशी. त्याचा आणखी त्रास व्हायचा..' 'बघ ना गं!.. आणि या अशा झळा लागतायत की, स्कार्फ तोंडभर गुंडाळावा लागतो. त्यामुळे अजूनच उकाडा !' भर दुपारच्या शांत वेळी. कॉलेजच्या वाटेवर, बसमध्ये, गाडीवर, ट्रेनमध्ये किंवा कुठल्याही नाक्यावर हे असे वैतागवाणे डायलॉग्ज दोन तरुण मैत्रिणींमध्ये झडू शकतात. या डायलॉग्जमधले मुद्दे जेन्युएन आहेत, पण जो नाइलाज झाल्याचा टोन आहे ना.. तो सुधारण्यासाठी हा लेख. उन्हाळ्यात प्रोटेक्शनच्या बरोबरीनेच स्टायिलग कसं करता येईल याच्या काही खास टिप्स..
vv15सुरुवात करूया स्कार्फपासून
उन्हाळ्यात बाहेर पडताना स्कार्फ मस्ट आहे. पण तो तोंडभरच गुंडाळला पाहिजे असा कुठेही नियम नाही. विशेषत मुंबईच्या वातावरणात उन्हाच्या चटक्याबरोबर घामाच्या धाराही नखशिखांत भिजवत असतात. त्यामध्ये हा दुहेरी- तिहेरी स्कार्फ जीव गुदमरून टाकतो. हाच स्कार्फ मग गरम झालं की गळ्याभोवती लूज सर्कल करून घेऊ शकता. डोक्यावरून घ्यायचा असेल तेव्हा, आधी डोक्यावरून अलगद घेऊन त्याच्या एका टोकाला सलसर गाठ बांधून दुसरं टोक त्या गाठीतून घाला आणि तयार झालेलं लूप हलकेच वर ओढा. हा लुक खूपच छान दिसतो आणि कम्फर्टेबलपण असतो. उन्हाळ्यात वेगवेगळे बन्स किंवा बंधानाज केसाला गुंडाळून एक मस्त लुक आणता येतो.
vv16हॉट हॅट हिट
हॅटची फॅशन आपल्याकडे रोजच्या धकाधकीत करणं शक्य नाही. कारण दुचाकीवर, बसमध्ये किंवा गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये डोक्यावरची हॅट सांभाळणं म्हणजे तशी कसरतच. पण तुम्ही ट्रिपला जाणार असाल किंवा फ्रेंड्सबरोबर ब्रंच पार्टीला जायचं असेल तर स्कार्फऐवजी हॅटचा पर्याय नक्की ट्राय करा. हॅटमुळे एक तर उन्हापासून चांगलं संरक्षण मिळतं आणि हॅटची फॅशन तुमचा लुक एकदम बदलून टाकते. कॅज्युअल वेअरवर हॅटचं कॉम्बिनेशन परफेक्ट मॅच होतं. एखाद् दोन हॉट हॅट आपल्याकडे उन्हाळ्यासाठी असल्याच पाहिजेत.
vv17सन ग्लासेस
उन्हाळा स्टायलिश करायचा असेल तर सनग्लासेसना पर्याय नाही. सध्या अनेक प्रकारचे सन ग्लासेस उपलब्ध आहेत. सध्या ग्लासेसचा राउंड शेप फॉर्मात आहे. याशिवाय स्वेअर, ओव्हल, कॅट्स आय शेप अशा वेगवेगळ्या आकारांतदेखील गॉगल्स मिळतात. चेहऱ्याला सूट होईल असा शेप निवडावा. पण रस्त्यावरच्या स्वस्त गॉगलपासून थोडं सावधान. त्या काचेचा भरवसा नसतो. त्यामुळे डोळ्यांचं संरक्षण होण्याऐवजी डोळ्यावर ताणच यायचा. यूव्ही प्रोटेक्टेड लेन्स बघूनच गॉगलची खरेदी करणं चांगलं. कलरफुल फ्रेम्ड सनग्लासेसचा ट्रेण्ड सध्या आहे. कलर्ड ग्लासेसमध्ये डोळ्यांना मानवेल, त्रास होणार नाही, असाच काचांचा रंग असावा. फ्रेमचा रंग मात्र तुम्ही तुमच्या बोल्डनेसनुसार कुठलाही निवडू शकता. अगदी व्हाइट फ्रेमपासून नियॉन कलरच्या फ्रेम्सही बाजारात आल्या आहेत. ओव्हरसाइझ गॉगलची फॅशन या सीझनमध्ये अजूनही चलतीत आहे. याशिवाय एव्हिएटर सनग्लासेसही ट्रेण्डमध्ये आहेत. पण कॅट आय फ्रेम आणि बटरफ्लाय फ्रेम ही सनग्लासेसमधली हॉट सिलेक्शन असू शकतात.
ओव्हरकोट्स बाय बाय
सनकोट किंवा ओव्हरकोट्सची फॅशन आता आउट डेटेड झाली आहे. ते पोल्का डॉट्स किंवा फुलाफुलांचे सफेद सनकोट्स घेण्याऐवजी त्याचा थोडा स्टायलिश अवतार.. कॉटन जॅकेट घेऊ शकता. जॅकेट किंवा श्रग कॉटनचा आणि अगदी पातळ असला की झालं. कुठलाही ट्युनिक, टीशर्ट आणि हे फंकी जॅकेट हे कोम्बो फारच उत्तम दिसेल. सध्या वेगवेगळ्या नेट जॅकेट, होजिअरी जॅकेटची चलती आहे. बांद्रा लिंकिंग रोड, फॅशन स्ट्रीट, पुण्यात फग्र्युसन रोड इत्यादी ठिकाणी अशी जॅकेट्स उपलब्ध आहेत. यांची किंमतदेखील २०० ते ५०० रुपयांच्या रेंजमध्ये आहे. त्याचबरोबर डेनिम जॅकेट्ससुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. अशी जॅकेट्स दिसायला तर कूल दिसतीलच, पण त्याचबरोबर उन्हापासूनही रक्षण करतील. फक्त ती जाड असतील तर उकाडय़ाचा त्रास होऊ शकतो.
नो डेनिम्स आणि नो जॉर्जेट
जीन्सशिवाय नो ऑप्शन असं म्हणणाऱ्या कितीतरी जणी उन्हाळ्यात जीन्समुळे त्रस्त झालेल्या दिसतात. जीन्सऐवजी होजिअरी, कॉटन मटेरियलचे पाजामा, धोती स्टाइल पाजामा किंवा पलाझो वापरू शकता. यावर कॉमन गर्ली टॉप न घालता होजिअरी मटेरियलमधील बॉइज टीशर्ट किंवा गंजी टॉप घालू शकता. परफेक्ट फंकी समर लुक मिळेल. ब्लॅक शेडमधले कपडे उन्हात जाताना नकोतच आणि जॉर्जेट मटेरियल्सना निदान उन्हाळ्यात तरी राम राम ठोकायला हरकत नाही.
जीन्स ऐवजी कुलॉट्स हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. हे कुलॉट्स नी लेन्थ किंवा काफ लेन्थपर्यंत असतात. कुलॉट्स घातल्यावर स्कर्ट सारखा लुक आपल्याला मिळतो. कुलॉट्स पलाझो सारखे दिसत असल्यामुळे कन्फ्युजन होण्याची शक्यता असते . पण कुलॉट्स हे पालाझोजपेक्षा घेरदार असतात.
vv19फंकी सॉक्स
उन्हाळ्यात आपल्या पायांची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं असतं. विशेषत भर उन्हात बाहेर जाताना सॉक्स मस्ट. पण कॉमन सॉक्स वापरण्याऐवजी वेगवेगळ्या िपट्र्स असलेले सॉक्स, निऑन कलर्ड सॉक्स, बोल्ड पिट्र्सचे सॉक्स खूप उठून दिसतील. शॉर्ट लेन्थ कपडय़ांसाठी म्हणजे केप्रीज, स्कर्ट, शॉर्ट्स, कुलॉट्स घालून जाणार असाल तर स्टॉकिंग्ज घालू शकाल.

छायाचित्र: चिन्मय आपटे, मॉडेल : मधुरा गोडबोले
सौजन्य : त्रिवेणी एथनिक्स

प्राची परांजपे - viva.loksatta@gmail.com
सभार - लोकसत्ता

शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

उस्मानाबाद येथे जिल्ह्यांसाठी सैन्यभरती मेळावा/ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील प्राध्यापक पदाच्या 117 जागा/ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील विविध विषयांच्या प्राध्यापक पदाच्या 117 जागा/ लोकसभा सचिवालय येथे सुरक्षा साहाय्यक पदाच्या 12 जागा/ ओएनजीसी, मुंबई येथे पदाच्या 205 जागा / न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 128 जागा/ सीमा सुरक्षा दला मध्ये कॉन्स्टेबल (जीडी) पदाच्या 346 जागा

job logo साठी प्रतिमा परिणाम

  महाराष्ट्र वैभव- करियर न्यूज




उस्मानाबाद येथे 8 ते 18 एप्रिल पर्यंत पाच जिल्ह्यांसाठी सैन्यभरती मेळावा
उस्मानाबाद येथे सैन्यभरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, पुणे या पाच जिल्ह्यांसाठी हा मेळावा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात येत आहे. दि. 8 एप्रिल रोजी पुणे, 9 एप्रिल रोजी लातूर, दि. 10 व 11 एप्रिल रोजी उस्मानाबाद, दि. 12, 13 व 14 एप्रिल रोजी अहमदनगर, दि 15, 16 व 17 एप्रिल रोजी बीड, दि. 18 एप्रिल रोजी माजी सैनिकांचे पाल्य, युद्ध विधवांचे पाल्य आदींच्या साठी सैन्य भरती प्रक्रिया होईल. या मेळाव्यात जवान (जनरल ड्युटी), जवान (तांत्रिक), जवान (क्लर्क/एसकेटी), जवान (नर्सिंग असिस्टंट) आणि जवान (ट्रेडसमन) ही पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी या सैन्यभरती मेळाव्यास उपस्थित रहावे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील विविध विषयांच्या प्राध्यापक पदाच्या 117 जागा
वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभाग अंतर्गत वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील विविध विषयांचे प्राध्यापक (35 जागा), सहयोगी प्राध्यापक (82 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दि 8 मे ते 28 मे 2015 या कालावधीत अर्ज करावे. यासंबंधीची जाहिरात 9 एप्रिल 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदाच्या 96 जागा
भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदाच्या 96 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 9 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sbi.co.in किंवा www.statebankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लोकसभा सचिवालय येथे सिक्युरिटी असिस्टंट ग्रेड-2 (सुरक्षा साहाय्यक) पदाच्या 12 जागा
लोकसभा सचिवालय येथे सिक्युरिटी असिस्टंट ग्रेड-2 (सुरक्षा साहाय्यक) (12 जागा) या पदासाठी माजी सेनादल कर्मचाऱ्यांमधून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मे 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 7 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.loksabha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ओएनजीसी, मुंबई येथे पदाच्या 205 जागा
ओएनजीसी, मुंबई येथे विविध विद्याशाखेच्या अ-I (72 जागा), अ-II (133 जागा) स्तरावरील नियमित पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 2 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 128 जागा
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 128 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 2 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.npcilcareers.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सीमा सुरक्षा दला मध्ये कॉन्स्टेबल (जीडी) पदाच्या 346 जागा
सीमा सुरक्षा दला मध्ये स्पोर्टस् कोटाच्या अनुसार महिला व पुरुष खेळाडूंची कॉन्स्टेबल (जीडी) (346 जागा) पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस आहे. यासंबंधीची जाहिरात 4 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.bsf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.