शुक्रवार, २० मार्च, २०१५

मुलाखतीला जाताना..

मुलाखतीला जाताना..

 शिक्षण पूर्ण झालं की, पोटापाण्यासाठी नोकरीचा शोध सुरू होतो. स्पर्धेच्या या युगात नोकरी मिळविण्यासाठी चांगल्या क्वॉलिफिकेशनसोबतच चांगले व्यक्तिमत्त्वदेखील आवश्यक असते. मुलाखत ही नोकरी मिळविण्याची पहिली पायरी असते. मुलाखतीला सामोरं जाताना नेमकी काळजी कोणती घ्यावी, यासाठी काही टिप्स...


यारो, नोकरी जितकी महत्त्वाची असते तितकीच महत्त्वाची असते मुलाखत. म्हणतात ना ‘फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन’ ते अगदी खरं आहे. तुम्ही मुलाखत कशी देता, मुलाखतीदरम्यान तुमची बॉडीलँग्वेज कशी असते, विचारलेल्या प्रश्‍नांना तुम्ही कशा प्रकारे उत्तरे देता इत्यादी बाबींवर नोकरी अवलंबून असते. बरेचदा डिग्री असते, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीजमध्येही आपण अव्वल असतो, मात्र नेमकी मुलाखतीत माशी शिंकते. यालाच ‘इंटरव्ह्यू मॅनर्स’ म्हणतात. तेव्हा मुलाखतीला जाताना काही टिप्स कायम लक्षात ठेवाव्या :
मुलाखतीला जाताना.... साठी प्रतिमा परिणाम


प्रत्यक्ष मुलाखतीला सामोरे जाताना उमेदवाराने घाईगर्दीने बोलण्याचे टाळावे. समोरच्या माणसांना तुमच्या गुणांची चाचपणी करण्यास वेळ द्यावा.

सूचना मिळेपर्यंत खुर्चीवर बसू नये आणि बसण्याची सूचना मिळाल्यावर, काही वेळा बसण्याचे साधन रिकामे नसते अशा वेळी टेबलावर रेलू नका.


उमेदवाराचे उत्तर व्यवस्थित, मुद्देसूद आणि आकर्षक असावे. विचारल्याशिवाय अधिक माहिती देण्याच्या भानगडीत पडू नये.


उमेदवाराने नेहमी समोरच्याला सर किंवा मॅडम अशा आदरयुक्त शब्दाने हाक मारावी.


मुलाखत चालू असताना खोकला किंवा शिंक आल्यास तोंडासमोर रुमाल ठेवावा.


मुलाखत घेणारा हास्यविनोद करीत असल्यास उमेदवाराने सहभागी होऊ नये.


मुलाखत देताना अधिकाधिक ज्ञान, क्षमता, कौशल्य सादर करण्याचा प्रयत्न करावा.


समोर बसलेल्या उमेदवाराने नेहमी समोर बसलेल्या मुख्य माणसाला उत्तर द्यावे.


मुलाखतीला जाताना पुरुषाने नेहमी काळी, नेव्ही ब्लू, ग्रे रंगाची ट्राउझर आणि सॉफ्ट कलर शर्ट, पॉलिश केलेले काळे लेदर शूज, पांढरे सॉक्स, प्लेन टाय लावून जावे. कफलिंग किंवा चेनसारखी ज्वेलरी घातली नाही तरच उत्तम. खिशात पेन किंवा प्रवासाचे तिकीट ठेवू नये.


स्त्रियांनी काळ्या, निळ्या रंगाची ट्राउझर, सॉफ्ट कलर शर्ट, सॉफ्ट कलर पंजाबी ड्रेस किंवा साडी, गडद रंगाचे मेकअप टाळावे. हेअर स्टाईलमध्ये केस चेहर्‍यावर येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. काळ्या रंगाचे शूज वापरावेत, शक्यतोवर टोकदार शूज वापरू नयेत.


मुलाखतीच्या वेळी केबिनमध्ये शिरताना घाईघाईने आत शिरू नका, संयम आणि तोल सांभाळून आत शिरावे. आतमध्ये आल्यास सर्वप्रथम पॅनलमधील सर्व सदस्यांना अभिवादन करावे.


सूचना मिळेपर्यंत खुर्चीवर बसू नये आणि बसण्याची सूचना मिळाल्यावर, काही वेळा बसण्याचे साधन रिकामे नसते अशा वेळी टेबलावर रेलू नका.


कुणीही काहीही बोललं तरी मनाचा तोल ढासळू देऊ नका.


मुलाखतीत एखादे वाक्य इंग्रजी बोलत असाल तर ते देखील अचूक बोला नाहीतर स्वत:चा पोपट करून घेऊ नका. चुकीचे बोलून तुमच्या विषयीचे मत नकारात्मक होऊ देऊ नका


उत्तर नेहमी खंबीर आणि स्पष्टपणे द्यावे. बिचकतपणे उत्तरे देणे कधीही फायद्याचे ठरणार नाही.


शक्य झाल्यास मुलाखत घेणार्‍याच्या मनाचा मागोवा घेण्याची हातोटी तुम्हाला साधता यायला हवी. तीही तोंडी आणि अतिशय थोडक्या वेळात.


महत्त्वाकांक्षी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. प्रामाणिक राहावे.


वेगळ्या पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांनी विचलित होऊ नका. रिझ्युम नेटका तयार करावा.


मोठमोठी अगडबंब भपकेबाज उत्तरं देऊन तुमच्या परीक्षकांच्या मनात गोंधळ उडवून देऊ नका, स्पष्ट व मुद्देसूद उत्तरं द्यावीत.


मुलाखत घेणार्‍यांच्या नजरेला नजर मिळवून बोलावे. अधूनमधून स्मित हास्य करायला विसरू नये.


मुलाखतीचा अगोदर सराव करावा.


यशस्वी व जिंकण्याची मनोवृत्ती ठेवावी.


मुलाखतीच्या ठिकाणी वेळेच्या आधी १५ मिनिटे पोहोचावे.


तुम्हाला काहीही सूचना मिळेपर्यंत मुलाखतीचा कक्ष सोडू नये.


जाताना आभार मानायला विसरू नका आणि एकदा जाण्यासाठी निघाल्यानंतर मागे वळून पाहू नका.


मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचल्यावर उपस्थित असणार्‍या इतर उमेदवारांशी ओळख करून घ्या. त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नांची माहिती करून घ्यावी.

मार्केटिंग स्ट्रॅटेजी चांगल्या पध्दतीने समजून घ्या. कारण तुमच्या कामातून तुम्ही कंपनीच्या प्रोग्रेससाठी काय काय करणार आहेत हे मुलाखत पॅनलला सांगण्याची गरज पडू शकत


अशाप्रकारे तयारी करून एखाद्या दक्ष सैनिकाप्रमाणे मुलाखतीसाठी जा. मनाने रीलॅक्स आणि बुद्धीने तयार राहा. मग यश तुमचेच आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा