मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

रोजगार देणारे शिक्षण

रोजगार देणारे शिक्षण
भारताला दोन जागतिक पेचप्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. ते म्हणजे मोठय़ा प्रमाणावरील तरुण बेरोजगार आणि महत्त्वाची कौशल्ये संपादन केलेल्या व्यक्तींचा तुटवडा. 
सामाजिक व आíथक संकटांमधील शक्य परिणामांचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आज असे अनेक युवत-युवती आहेत, ज्यांना आपल्याला हवी ती नोकरी आपल्याला मिळेल का, अथवा आपण ती करू शकू का, अशी धाकधूक वाटत असते. देशाच्या कानाकोपऱ्यातील युवावर्गात धुमसणाऱ्या अस्वस्थतेवर नजर टाकली तरी त्यातून स्पष्ट होते की, जर आपण रोजगाराचे उपयुक्त कौशल्य प्रशिक्षण दिले नाही तर नजीकच्या भविष्यकाळात देशात असंख्य निरुपयोगी पदवीधर उभे राहतील.
अलीकडच्या अभ्यासाक्रमानुसार, टॉप
१० टक्क्यांचे उत्पन्न तळागाळातील
१० टक्क्यांहून १० पटीने जास्त आहे. युवावर्गातील बेरोजगारपणा कमी करण्यासाठी दोन आधारभूत गोष्टी महत्त्वाच्या आहेत- क्षमतांचा विकास आणि नव्या नोकऱ्यांची निर्मिती. स्पष्टपणे कर्मचाऱ्यांना शिक्षण पुरवठादारांसोबत काम करणे गरजेचे आहे, जेणेकरून विद्यार्थी त्यांना आवश्यक असलेली, कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठीची कौशल्ये आत्मसात करतील आणि यात सरकारची भूमिका महत्त्वाची ठरते. 
अलीकडच्या मॅकिन्जे ग्लोबल स्टडीनुसार, जगभरात -
* ७५ दशलक्ष तरुण बेरोजगार आहेत.
* ५४ % तरुणांना खात्री नाही की त्यांच्या माध्यमिक शिक्षणानंतरच्या पुढील शिक्षणामुळे नोकरी शोधण्याच्या त्यांच्या संधींमध्ये सुधारणा होते की नाही..
* जवळजवळ ५३ टक्के कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रवेश स्तरावरील रिक्त पदांचे मुख्य कारण कौशल्यांचा अभाव हे आहे.
यात भारताशी संबंधित सहा महत्त्वाचे
विषय आहेत -
* कर्मचारी, शिक्षण पुरवठादार आणि युवावर्ग, या सर्वानी परस्परांशी संलग्न राहून काम करणे जरुरी आहे, अन्यथा या समस्येकडे पाहण्याची प्रत्येकाची मानसिकता भिन्न होते.
* शिक्षण ते रोजगार या मार्गावर तीन महत्त्वाचे अडथळे स्पष्ट करणे आवश्यक आहे
* प्रवेशावेळी भरावे लागणारे पैसे जे अनियमित असतात आणि मागणी-पुरवठा यावर आधारित असतात.
* विश्वसनीय ऑन-द-जॉब ट्रेिनग आणि शिकणाऱ्यांचा अभाव.
शिक्षणाशी संबंधित नोकरी शोधणे आणि कल
* बहुतांश कर्मचारी गुणवत्ता असलेले उमेदवार आकर्षति करण्यात आणि राखण्यामध्ये अपयशी ठरतात, कारण ते योग्य उमेदवारांपर्यंत पोहोचत नाहीत आणि जुडले जात नाहीत, अनेक युवांपकी फारच कमी जणांना त्यांच्या मनाप्रमाणे नोकरी मिळते. मात्र, बहुतांश तरुणांचे नुकसान होते कारण ते निष्काळजी राहतात, ते संघर्ष करत नाहीत आणि कायम निरुत्साही राहतात. 
* रोजगारयोग्य युवावर्ग निर्माण करण्यामध्ये दोन महत्त्वाचे यशस्वी घटक दिसून आले आहेत- ज्यामध्ये शिक्षण पुरवठादार आणि कर्मचारी एकमेकांशी सक्रियपणे संवाद साधतात. कर्मचाऱ्यांनी अभ्यासक्रम डिझाइन करण्यात मदत केली पाहिजे आणि त्यांना अतिथी शिक्षक म्हणून ऑफर दिली पहिजे - बोलावले पाहिजे. शिक्षण पुरवठादारांनी जॉब साइट्स आणि नोकरीची हमी देण्यासंबंधी विद्यार्थ्यांसाठी दीर्घकालीन इन्टर्नशिप कालावधी असेल याची खात्री केली पाहिजे. फक्त एकाच वेळी नोकरी देणे आणि प्लेसमेंट्सऐवजी शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या कालावधी दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांसोबत जुडण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे.
* नोकरी निवडीसंबंधातील माहितीच्या प्रसारामध्ये प्रसारमाध्यमे व सरकारची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यांना करिअर पर्याय आणि ट्रेिनग मार्गावर माहितीचा अखंड पुरवठा गरजेचा असतो. प्रवेशापूर्वी कॅचमेंटवर ते असल्यामुळे शिक्षण पुरवठादारांनी जॉब प्लेसमेंट आणि करिअर मार्गक्रमणामध्ये अधिक स्वारस्य दाखवणे गरजेचे आहे. शाळा सोडल्यानंतर किंवा अभ्यासासाठी कोर्स घेतल्यानंतर कशाचा सामना करावा लागणार आहे, यांची तरुणांना स्पष्ट कल्पना असली पाहिजे. शैक्षणिक संस्थांनी ते काय शिकवत आहेत आणि नोकरीच्या बाजारपेठेत ते विद्यार्थ्यांशी कसे जुडले जातील याबाबत दक्ष असले पाहिजे. 
* अखेरीस किमतीचा समावेश करण्यासाठी शिक्षण पुरवठादारांनी कर्मचाऱ्यांच्या गरजांनुसार अनुकूल  किमतीमध्ये दर्जात्मक अभ्यासक्रम डिझाइन आणि प्रसार करण्यामध्ये इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे आहे.
रोजगार प्रदाता कामाच्या काळामधील मागणी आणि कर्मचाऱ्यांचा ठराविक अभ्यासक्रम देण्याकरिता विद्यार्थ्यांना व्यावहारिक दृष्टिकोन देण्यामध्ये नेटवर आधारित अ‍ॅप्रेन्टिसशिप मॉडय़ुल निर्माण करू शकतात.
सुनील चतुर्वेदी
संचालक - फार्मा नेटवर्क,
एनएमआयएमएस स्कूल ऑफ फार्मसी अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट

सोमवार, ३० डिसेंबर, २०१३

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कनिष्ठ सहाय्यकाच्या 690 जागा,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाच्या नागपूर विभागात ४ जागा,भारतीय हवाई दलात 45 जागा

महाराष्ट्र वैभव- करियर न्यूज

 रोजगाराची संधी
 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कनिष्ठ सहाय्यकाच्या 690 जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कनिष्ठ सहाय्यक (690 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2014 आहे. अर्ज व इतर माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाच्या नागपूर विभागात ४ जागा

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाच्या नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा या कार्यालयात लिपिक टंकलेखक (2 जागा), शिपाई (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/Vacancy%20Press%20Notes1_30122013.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


भारतीय हवाई दलात 45 जागा

संरक्षण मंत्रालयाच्या भारतीय हवाई दलात कनिष्ठस्तर लिपिक (2 जागा), एमटीडी (1 जागा), स्वयंपाकी (5 जागा), पेंटर (1 जागा), एमटीएस (16 जागा), मेस स्टाफ (10 जागा), सफाईवाला (7 जागा), आया (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. अधिक माहिती व जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 28 डिसेंबर 2013-3 जानेवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१३

राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेच्या 93 जागांसाठी भरती,उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या नाशिक विभागीय कार्यालयात 13 जागा,बीड उत्पादन शुल्क कार्यालयात 13 जागा.

महाराष्ट्र वैभव- करियर न्यूज

 रोजगाराची संधी
राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेच्या 93 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षेची घोषणा केली आहे. या परीक्षेद्वारे पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त (24 जागा), उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (9 जागा), सहायक संचालक-महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (7 जागा), कक्ष अधिकारी (2 जागा), सहायक गट विकास अधिकारी (46 जागा), उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (2 जागा), सहायक आयुक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mahaonline.gov.in व http://mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या नाशिक विभागीय कार्यालयात 13 जागा

नाशिक विभागीय उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणा या कार्यालयात सर्वेक्षक (2 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली वरिष्ठ सहाय्यक (1 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक (7 जागा), वरिष्ठ लिपिक (1 जागा), कनिष्ठ लिपिक (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/WSSD20131219.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बीड उत्पादन शुल्क कार्यालयात 13 जागा

बीडच्या अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात जवान (9 जागा), जवान नि वाहनचालक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती m www.becdexam.in/excise व https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

करियर न्यूज पुण्यातील येरवडा कारागृह मुद्रणालयात 9 जागा,शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे कार्यालयात 11 जागा सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात लिपिकांच्या 6 जागा......

  महाराष्ट्र वैभव- करियर न्यूज
 रोजगाराची संधी
पुण्यातील येरवडा कारागृह मुद्रणालयात 9 जागा

महाराष्ट्र शासनाच्या पुण्यातील येरवडा कारागृह मुद्रणालयात शिपाई (2 जागा), मजूर (4 जागा), पहारेकरी (2 जागा), माळी नि सफाईगार (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 6 जानेवारी 2014 आहे.यासंबंधीची अधिक माहिती www.yerwadaprisonpress.com व www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे कार्यालयात 11 जागा

महाराष्ट्र शासनाच्या शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे या कार्यालयात लिपिक टंकलेखक (3 जागा), सुतार (1 जागा), परिचर प्रतिरुप (1 जागा), बांधणी सहाय्यकारी (2 जागा), गणक (3 जागा), प्रक्रिया सहाय्यकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात लिपिकांच्या 6 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या आस्‍थापनेवरील गट क मधील लिपिक - कनिष्‍ठ श्रेणी (6 जागा) हे पद भरण्‍यात येणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2013 आहे. अधिक माहिती www.sindhudugpolice.gov.in आणि www.sindudurg.nic.in या संकेतस्‍थळांवर उपलब्‍ध आहे.

रविवार, १५ डिसेंबर, २०१३

करियर टिप्स

 करियर टिप्स

Three-issues-that-should-top-the-IT-agenda-this-year_394x296

झाला कि अभ्यासा .................. घरातील सगळे पालक मुलांच्या अभ्यासाच्या मागे लागतात. परंतु दहावी, बारावी आणि ग्रॅज्युएशन करताना त्या-त्या पातळीवर नेमकं काय करायचं/ अभ्यास करताना नेमका कसा करावा याबाबत थेट 11 टिप्स तुम्हांला देत आहेत.
 
1.कधीही फार तास सलग अभ्यासाला बसू नका. तासभराने दहा मिनिटांचा ब्रेक हवाच.

2. अभ्यासासाठी टाइमटेबल बनवा. त्याचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी मित्रांना आणि घरी जाहीर करून टाका. म्हणजे ते फॉलो करण्यासाठी घरातल्यांची मदतच होईल.

3. अभ्यास करणं म्हणजे घोकंपट्टी नको. संकल्पना समजून घेऊन अभ्यास केलेला चांगला.

4. एखाद्या गोष्टीमुळे टाइमटेबल फॉलो झलं नसेल तर तसं नोट डाऊन करून ठेवा. ती गोष्ट, धड, मॅथ्स नंत र करायचं आहे हे लक्षात ठेवा.

5. फ्रेश वातावरण असलेल्या ठिकाणी अभ्यासाला बसा.

6. वाचताना महत्त्वाची वाक्य, शब्द अधोरेखीत करून ठेवा. पुन्हा तो धडा चाळताना त्याचा उपयोग होईल. तसंच, दिवसांतला 15 मिनिटांचा वेळ उजळणीसाठी ठेवा.

7. वीकेण्डला स्वत:ची टेस्ट घेऊन मार्कही द्या. अभ्यास कुठपर्यंत पोचलाय हे कळेल.

8. अभ्यास करताना फळं आणि पाणी थोड्या थोड्या वेळाने घेत राहा.

9. दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांनी सुट्टीत करिअर कौन्सिलरकडून अॅप्टिट्यूट टेस्ट करून घ्यालला हवी. जेणेकरून आपला कल, क्षमता लक्षात येऊन अकरावीला शाखा निवडणठ सोपं जाईल.

10. बारावीला गेलेल्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासाक्रमाकडे वळायचं असल्यास त्याची माहिती मिळावयल सुरुवात करा. अभ्यासक्रमांतले बदल याकडेही लक्ष ठेवायला हवं.

11. तसंच, जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला आहेत त्यांनी आपलं करियर अधिक फोकस्ड ठेवायला हवं. पुढे शिकायचं असल्यास त्याची माहिती मिळावयला हवी. खासगी नोकरी करयाची असल्यास संवाद कौशल्य वाढवायला हवं. 

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१३

करियर न्यूजपुणे येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयात 77 जागा/नागपूर येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयात 25 जागा/मुंबई विभागीय कार्यालयाउच्च शिक्षण विभागाच्या त 48 जागा/सह जिल्हा निबंधक पुणे शहर व ग्रामीण या कार्यालयात 43 जागा

पुणे येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयात 77 जागा


महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाच्या अधिनस्त कार्यालयात वरिष्ठ लिपिक (2 जागा), लिपिक नि टंकलेखक (7 जागा), भांडारपाल (2 जागा), भांडारपाल –कनिष्ठ श्रेणी (1 जागा), लिपिक तथा भांडारपाल (1 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), अतांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (13 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (14 जागा), वीजतंत्री (3 जागा), विद्युतमिस्त्री/वीजमिस्त्री (2 जागा), बंधकार (2 जागा), दूरध्वनीचालक तथा चौकशी सहाय्यक (1 जागा), सर्वसाधारण यांत्रिकी (1 जागा), सुतार (1 जागा), अभिरक्षक/अभिरक्षक भूमापन उपकरण (3 जागा), विद्युत उपकरण यांत्रिकी (1 जागा), सहाय्यक इंजिन चालक (1 जागा), संग्रहाल सहाय्यक (1 जागा), तारतंत्री तथा प्रयोगशाळा सहाय्यक (1 जागा), ऑटो टेक्निशियन (3 जागा), पूर्णवेळ शिक्षक (1 जागा), ग्रंथपरिचर (1 जागा), भांडारपरिचर (1 जागा), शिपाई/ग्रंथालय शिपाई (1 जागा), हमाल (1 जागा), प्रयोगशाळा परिचर (10 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte2013https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/ropune_5Dec13.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


नागपूर येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयात 25 जागा

महाराष्ट्र शासनाच्या नागपूर येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाच्या अधिनस्त कार्यालयात लघुलेखक (1 जागा), कनिष्ठ लिपिक (3 जागा), भांडारपाल (2 जागा), सुतार (1 जागा), वीजतंत्री (1 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (3 जागा), प्रयोगशाळा परिचर (5 जागा), शिपाई/ग्रंथालय शिपाई (7 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


मुंबई विभागीय कार्यालया
उच्च शिक्षण विभागाच्या त 48 जागा

महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयात ग्रंथालय परिचर/प्रयोगशाळा परिचर (28 जागा), शिपाई (16 जागा), मजदूर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdhe2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


सह जिल्हा निबंधक पुणे शहर व ग्रामीण या कार्यालयात 43 जागा

सह जिल्हा निबंधक पुणे शहर व ग्रामीण या कार्यालयात लिपिक टंकलेखक (25 जागा), वाहनचालक (1 जागा), शिपाई (17 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdr या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

पश्चिम रेल्वे भरती ५७७५ जागांसाठी...

पश्चिम रेल्वे मुंबई विभागामध्ये गँगमन, ट्रॅकमन, हेल्पर, खलाशी, पोर्टर या पदांवरील ५७७५ जागांसाठी भरती होणार आहे.

वेतनश्रेणी - रू.५२०० - २०२०० ग्रेड पे रू. १८००

वयोमर्यादा - १८ ते ३३ वर्षे

शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण

निवडप्रक्रिया - अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षेसाठी बोलावले जाते. यानंतर शारीरिक क्षमता चाचणी व वैद्यकीय तपासणी केली जाते.

लेखी परीक्षेमध्ये १०० वस्तुनिष्ठ (बहुपर्यायी) प्रश्न विचारले जातात. यासाठी ९० मिनिटे कालावधी असतो. प्रश्न सामान्य ज्ञान, गणित, सामान्य विज्ञान व तर्कावर आधारित असतात. प्रश्नांचा स्तर दहावीपर्यंतचा असतो. प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू व गुजराती भाषेत असतील. चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जातील.

शारीरिक क्षमता चाचणी - पुरुष उमेदवारांनी एकाच प्रयत्नामध्ये १ कि.मी. अंतर ४ मिनिटे व १५ सेकंदामध्ये धावले पाहिजे तर स्त्री उमेदवारांनी एकाच प्रयत्नामध्ये ४०० मी. अंतर ३ मिनिटे व १०

प्रवेश अर्जाचा नमुना एम्प्लॉयमेंट न्यूज (दिनांक ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१३) मध्ये उपलब्ध आहे

किंवा  http://www.rrc-wr.com/ वेबसाईटवरून ही डाऊनलोड करून घेता येईल. परीक्षा फी रू १००/- आहे.

प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख - १४ जानेवारी २०१४

सोमवार, ९ डिसेंबर, २०१३

करियर न्यूज




पदाचे नावअर्ज करण्याचा दिनांकअर्ज करण्याचा अंतिम दिनांकस्थिती
प्रशासकीय अधिकारी, आयुर्वेद संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट ब 05-12-2013 26-12-2013

प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब अन्न व औषध प्रशासन, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग. 05-12-2013 26-12-2013

सहायक वन सांख्यिक, सामान्य राज्य सेवा गट-ब (वन विभाग) 05-12-2013 26-12-2013

वन सांख्यिक, सामान्य राज्य सेवा गट-अ (वन विभाग) 05-12-2013 26-12-2013

मुख्य वन सांख्यिक, सामान्य राज्य सेवा गट-अ (वन विभाग) 05-12-2013 26-12-2013

प्राध्यापक, क्षकिरणशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ 30-11-2013 21-12-2013

रसायन-नि-औषध निर्माता, आयुर्वेद संचालनालय, गट ब 30-11-2013 21-12-2013

प्राचार्य आणि उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय/केंद्र / निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी / सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार (व)(तां), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (कनिष्ठ) (तांत्रिक) 30-11-2013 21-12-2013

प्रबंधक,शासकीय कला संस्था,गट-ब(प्रशासकीय शाखा) 30-11-2013 21-12-2013

प्रबंधक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय / शासकीय तंत्रनिकेतन, महारष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक व प्रशासकीय सेवा, गट-ब 30-11-2013 21-12-2013

प्रबंधक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- ब (अतांत्रिक) 30-11-2013 21-12-2013

संशोधन सहाय्यक, बृहन्मुंबई महानगरपालिका , महापालिका वरिष्ठ सेवा 26-11-2013 24-12-2013

अनुवादक (हिंदी), सामान्य राज्य सेवा, भाषा संचालनालय, गट-क 26-11-2013 24-12-2013

संचालक, पुराभिलेख संचालनालय, (गट अ) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. 26-11-2013 24-12-2013

उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिचण अधिकारी (अतांत्रिक) / सहायक संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण (वरिष्ठ)(अतांत्रिक), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनायल, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (कनिष्ठ) 26-11-2013 24-12-2013

कर्मशाळा अधिक्षक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयीन शिक्षक सेवा, गट-अ 26-11-2013 24-12-2013