शनिवार, २० जून, २०१५

'रिझ्यूम' तयार करताना...

'रिझ्यूम' तयार करताना...

career
नोकरी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील 'टर्निंग पॉईंट' असतो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उत्तम जॉब मिळवणं हे तर प्रत्येकाच्या आयुष्याचे 'मिशन' असते तर नोकरी मिळाली पण त्यात 'सॅटीसफॅक्शन' नाही, असे चांगल्या 'ब्रेक'च्या प्रतिक्षेत असतात. त्यासाठी तुमचा 'सीव्ही' अर्थात 'रिझ्युम' देखील तितकाच ताकदीचा हवा. आकर्षक हवा. तुमचा 'सीव्ही' पाहताच तुम्हाला 'ऑफर लेटर' मिळावे असा छाप पाडणारा असायला पाहिजे. त्यासाठीच या काही टिप्स...

तुमच्यात असलेली कौशल्ये व त्या- त्या जॉबसाठी आवश्यक असलेली कौशल्ये यांची सांगड तुमच्या सीव्हीमध्ये व्यवस्थीत घातलेली असवी. काही ठिकाणी तुमच्याकडे असलेला अनुभव पुरेसा नसतो तर अशावेळी तुम्ही त्या-त्या पोस्टसाठी कसे 'फिट' आहे, हे 'रिझ्युम'मध्ये 'प्रेझेण्ट' करता आले पाहिजे.

तुमचा 'रिझ्यूम' चांगला बनवण्यासाठी काही टिप्स :

* तुमचा 'रिझ्यूम' हा मुलाखत घेणार्‍याला तुमची ओळख करून देत असतो. त्यामुळे तुमचे शिक्षण, वैयक्तीक माहिती, अनुभव, आवडी- निवडी, विशेष गुण ह्यांची मुलाखत घेणार्‍यास कल्पना आली पाहिजे.

* तुम्ही केलेले शिक्षण, कोसेर्सची माहिती, ज्या संस्थेतून केले त्याचे नाव अशा सर्व गोष्टी त्यात असाव्यात. तुमचं 'लेटेस्ट क्वालिफिकेशन' सर्वात वर असायला हवं.

* 'रिझ्यूम' हा तुम्ही तयार केला असल्याने त्याबद्दल तुम्हाला सखोल माहिती असणे आवश्यक असते. मुलाखत घेणार्‍याकडून त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. 'रिझ्यूम'मधील एखादा मुद्दा समजावून सांगताना गोंधळ होता कामा नये. त्यामुळे 'रिझ्यूम' स्वत:च्या शब्दांत आणि सोप्या भाषेतच लिहिला पाहिजे.

* तुम्ही शिक्षणात तसेच आधीच्या नोकरीत विशेष प्राविण्य मिळवले असेल तर त्याला तुमच्या 'रिझ्यूम'मध्ये चांगले स्थान दिले पाहिजे. त्याची थोडक्यात पण संमर्पक माहिती दिली पाहिचे.

* तुमच्या आवडी-निवडी, छंद या बाबी देखील महत्त्वाच्या आहेत. त्यांनाही तुमच्या 'रिझ्यूम'मध्ये स्थान मिळाले पाहिजे.

* 'रिझ्यूम'मध्ये अनावश्यक गोष्टी लिहणे कटाक्षाने टाळावे.

नोकरी म‍िळावी, तिच्यावरच आयुष्य खपवावं आणि वयाच्या 58 व्या वर्षी 'रिटायर्ड' व्हावं. हा आपल्या वडिलांचा काळ केव्हाच मागे पडला आहे. आजचे युग हे फास्ट झाले आहे. त्यामुळे दोन- तीन वर्षात नोकरी 'चेंज' करणे आजच्या यंगस्टर्सचे तर वैशिष्ट्य झाले आहे.

बुधवार, २० मे, २०१५

नेतृत्वगुण जोपासण्यासाठी (To nurture leadership quality.)

 नेतृत्वगुण जोपासण्यासाठी(To nurture leadership quality)

कुठल्याही क्षेत्रात यशाची शिडी चढायची असल्यास तुमच्यात नेतृत्त्वगुण बाणवणे आवश्यक आहे. नेतृत्त्व गुण जोपासणे म्हणजे नेमके काय, ते जाणून घेऊयात.
नेतृत्वगुणांची गरज
कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाले तर कामाच्या ठिकाणी कोणत्याही लहान किंवा मोठय़ा सांघिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी नेतृत्वगुणांची आवश्यकता भासते. मग ती जबाबदारी कोणतीही असो, एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमधील प्रोग्रािमग प्रोजेक्टचे नेतृत्त्व करणे असो, अकाउंटन्टने कंपनीचे ऑडिट वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी असो, किंवा एखाद्या इव्हेन्ट मनेजमेंट कंपनीतील इव्हेंटचे सोपस्कार पूर्ण करणे असो.. आजच्या स्पर्धात्मक कार्यपद्धतीत, कंपनीच्या व्यवस्थापनासमोर किंवा वरिष्ठांसमोर, अन्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत स्वतचे वेगळे स्थान निर्माण करायचे असेल तर, नेतृत्वगुण बाणवणे अत्यावश्यक आहे. नेतृत्वगुण हा कोणता एक गुण नसून गुणांचा समूह आहे .
सकारात्मक विचारसरणी
सर्व काळजी घेऊनही, अनेकदा कामात त्रुटी राहू शकते. त्यामुळे काही वेळा अचानक तणावाची परिस्थिती कामाच्या ठिकाणी निर्माण होते, अशा काळात गटप्रमुखाने धीर न सोडता, खंबीरपणे परिस्थिती हाताळणे गरजेचे असते. झालेल्या घटनांचे योग्य विश्लेषण करून वेळेचे, श्रमांचे नुकसान कसे भरून काढता येईल आणि ध्येयापर्यंतचा पुढील मार्ग कसा निर्धोक होईल, याबद्दल गटप्रमुखाने सकारात्मक पावले उचलायला हवीत.
स्वयंमूल्यांकन
समूहाचे मार्गदर्शक होण्याआधी, स्वतला ओळखणे, स्वतच्या मर्यादा, क्षमता, माहितीच्या कक्षा, मेहनत घेण्याची तयारी अजमावून पाहायला हवी.
जोखीम स्वीकारण्याची तयारी
लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणींना सामोरे जाण्याची तसेच आíथक संकटांची जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि क्षमता नेत्याच्या अंगी असायला हवी.
जलद, प्रभावी निर्णयक्षमता
ईप्सित ध्येय साध्य करण्यासाठी, नेत्याने
आवश्यक ती निर्णयप्रक्रिया जलद आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी नेत्याने स्वीकारायला हवी.
संयत वर्तणूक
समूहातील सहकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन, त्यांच्या कामातील दोष, त्या त्या वेळेस मात्र संयत पद्धतीने दाखवून दिल्यास कामातील अडथळेही दूर होतात आणि सहकाऱ्यांचा गटप्रमुखाबाबतचा आदर दुणावतो.
आरंभशीलता
कोणतीही नवीन जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी लागेल ती मेहनत करण्याची आरंभशील वृत्ती नेत्याच्या अंगी असणे फार महत्त्वाचे आहे.
हस्तांतरणकौशल्य
अपेक्षित काम योग्य वेळेत आणि योग्य प्रकारे पूर्ण होण्यासाठी, सर्व समूहसदस्यांचा एकत्रित सहभाग गरजेचा असतो. यासाठी नेत्याने कामाचे योग्य प्रकारे विभाजन करून सदस्यांच्या क्षमता आणि अनुभव लक्षात घेऊन, कामाचे हस्तांतरण करणे आवश्यक असते. यामुळे कामाचा वेग वाढतो, सर्व सदस्यांना कोणती ना कोणती जवाबदारी पेलल्याचे समाधान मिळते. दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना अधिकाराचे स्वातंत्र्यही हस्तांतरित करणेही महत्त्वाचे आहे.
प्रोत्साहन
कामाचा वेग आणि दर्जा उत्तम राखण्याकरता कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीची गटप्रमुखाने वेळोवेळी दखल घेत त्यांची प्रशंसा करणे आवश्यक आहे. त्यांच्या अडचणी, मर्यादा लक्षात घेऊन प्रमुखाने केलेली मदत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते. आणि कामाचा उत्साह टिकवून ठेवते.
संवादकौशल्य
कामाच्या ठिकाणचे वातावरण निकोप राहावे, याकरता समूहातील सदस्यांचा आपापसांत आणि नेत्याचा समूहसदस्यांशी सुसंवाद राहणे गरजेचे आहे. यामुळे समूह आणि नेता यांचे परस्परांशी सहकार्याचे आणि सामंजस्याचे संबंध राहून, लक्ष्य गाठणे सोपे होते. यासाठी आधी नेत्याने समूहातील सर्वाशी नेमाने संवाद साधायला हवा; काही वेळा कार्यालयातील औपचारिक संकेत बाजूला सारून नेत्याने समूहसदस्यांशी जाणीवपूर्वक अनौपचारिक संवादही साधायला हवा. यामुळे नेता आणि समूहसदस्यांमध्ये आपुलकी
निर्माण होण्यास मदत होते
आणि अर्थातच याचा सकारात्मक परिणाम समूहाच्या कामगिरीवरही दिसून येतो.
उत्तम श्रोता
समूहातील प्रत्येकाशी स्वतंत्र किंवा एकत्रित संवाद साधताना शांतता आणि संयम राखून सदस्यांचे बोलणे गटप्रमुखाने ऐकून घ्यायला हवे. यामुळे समूहात सुसंवाद साधणे शक्य होते. त्याचप्रमाणे नवीन संकल्पनांची माहिती नेत्याला मिळू शकते. आपले म्हणणेही ऐकून घेतले जाते, असा विश्वास कर्मचाऱ्यांना वाटून त्यांचा काम करण्याचा उत्साह दुणावतो.
समूहाचे मूल्यांकन
गटप्रमुखाला ज्या समूहाबरोबर काम करायचे आहे त्या समूहातील सदस्यांबाबत काही मूलभूत गोष्टी माहिती असणे आवश्यक ठरते. समूहसदस्यांच्या क्षमता, मर्यादा, अडचणी, कोणता सदस्य कोणती गोष्ट चांगली पार पाडू शकेल, त्यांपकी कितीजणांनी, याआधी कोणत्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत, प्रत्येकाची शैक्षणिक क्षमता, अनुभव, कार्यपद्धती, शारीरिक आणि मानसिक क्षमता चाचपून पाहणे, प्रत्येक सदस्याशी मित्रत्वाचे आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे. या गोष्टी नेतृत्त्वाची परिणामकारकता वाढवतात.
प्रामाणिकपणा
नेत्याच्या वर्तणुकीतील आणि विचारांतील प्रामाणिकपणा समूहसदस्यांना जाणवल्याने संघनेतृत्व अधिक परिणामकारक बनते. स्वत:चे अज्ञान, चुका जिथल्या तिथे दिलदारपणे मान्य करण्याने, तसेच समूहसदस्यांनी दिलेल्या विशेष सहकार्याला सर्वासमक्ष उत्स्फूर्त दाद दिल्याने, समूहसदस्यांच्या मनात नेत्याची प्रतिमा उंचावते.
उत्तम वक्तृत्व
आपल्या मनातील भावना, इच्छा, विचार कर्मचाऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी, नेत्याच्या अंगी उत्तम वक्तृत्वगुण असायला हवेत. बोलणे सुसूत्र, मुद्देसूद, मनातली इच्छा व्यक्त करणारे असायला हवे. भाषा सर्वाना समजेल, रुचेल अशी हवी. मुख्य म्हणजे प्रभावी आणि स्पष्ट वक्तव्यातून, इच्छित ध्येय गाठण्याची आवश्यकता नेत्याने समूहाच्या मनावर ठसवणे गरजेचे असते. यामुळे नेत्याच्या मनातील ध्येय फक्त नेत्याचे न राहता, ते पूर्ण समूहाचे ध्येय बनते, आणि सांघिकशक्ती बळकट होते.
विनोदबुद्धी
तणावाच्या, अडचणीच्या क्षणी निराश न होता कामाच्या ठिकाणचे वातावरण हलकेफुलके ठेवले तर समूहातील सदस्यांच्या मनावरील ताण हलका होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. कोणाचेही मन न दुखावता, उद्भवलेल्या कठीण समस्येला सामंजस्याने सामोरं जाण्याची सवय नेत्याने जोपासायला हवी.
विश्वासार्हता
समूहातील सदस्यांचा, नेत्यावर विश्वास असणे गरजेचे असते. हा विश्वास संपादन करण्यासाठी नेत्याने स्वतच्या वागण्या-बोलण्यातून, समूहाने केलेल्या कामाची जवाबदारी पेलण्यास तो पूर्णपणे समर्थ आहे असा विश्वास सतत देत राहायला हवा. नेत्याने स्वत कामातील अचूकता, वक्तशीरपणा, आणि उत्तम वर्तनकौशल्य या गोष्टींतून समूहापुढे आदर्श घालून देणे गरजेचे ठरते.

सोमवार, १८ मे, २०१५

करिअर निवडताना

मित्रांनो, आपले करिअर निवडताना काही प्रश्न स्वत:ला विचारणे गरजेचे आहे....
*आपण कशाबद्दल निर्णय घेत आहोत याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे काय?
*स्वत:ला ओळखून निर्णय घेता का?
*कशा प्रकारच्या कामात मन रमते ?
*मला कशा प्रकारच्या लोकांबरोबर काम करायला आवडेल?
*माझी आर्थिक स्थिती काय आहे?
*माझी मानसिक स्थिती काय आहे?
*माझ्यात दोष-उणिवा काय आहेत?
*मला कुठली गोष्ट करायला आवडेल?
वरील सर्व प्रश्न स्वत:ला विचारून मगच निर्णयाकडे वळावे. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. 

 

शुक्रवार, ८ मे, २०१५

आयटीतले नवे स्कोप

  •  आयटीतले नवे स्कोप

    सोशल मीडिया मॅनेजर
     
    आज आपण मारे पडीक असतो सोशल मीडियावर, येताजाता अनेकांचे बोलणो खातो! पण ज्याला आपलं अकाउण्ट सतत चर्चेत ठेवता येतं, एकसेएक आयडिया लढवून जो आपलं ऑनलाइन फॉलोईंग वाढवू शकतो त्याला भविष्यात प्रचंड डिमाण्ड असणार आहे. खरं तर आजच त्यासाठीची योग्य माणसं अनेकांना मिळेनाशी झाली आहेत. 
    अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट या दोन्ही कंपन्यांत सोशल मीडिया मॅनेजर या पदावर आजही अनेक माणसं काम करतात. सध्या ते मार्केटिंग आणि जाहिरात याच दोन विभागात काम करत असले, तरी पुढील काळात अनेक कंपन्या यासाठी स्वतंत्र विभाग तयार करतील.
    काम काय?
    आपल्या कंपनीचं सोशल मीडिया अकाउण्ट सांभाळणं, प्रॉडक्टची माहिती देणं, आपला ब्रॅण्ड ऑनलाइन जगात डेव्हलप करणं हे त्यांचं काम!
    संधी कुणाला?
    खरं तर कुणालाही! पण त्यातही जाहिरात, कम्युनिकेशन, पत्रकारिता आणि भाषा या क्षेत्रंत काम करणा:यांसह आयटी आणि मार्केटिंगवाल्यांनाही यात संधी मिळू शकते!
     
    लॉजिस्टिशियन
     
    आपण बडय़ाबडय़ा मॉलमधे जातो.  तिथं अनेक वस्तूंचा खच पडलेला असतो. कधी विचार केलाय की, या मॉलमधे या वस्तू पोहचतात कशा? कुणीतरी तर माणसं असतील जे या सा:यांवर नजर ठेवत असतील!
    त्या नजर ठेवणा:या माणसांनाच म्हणतात, लॉजिस्टिशियन!
    अत्यंत कॉम्प्लेक्स कम्प्युटर सॉफ्टवेअर वापरून ही माणसं वस्तूंच्या यातायातवर लक्ष ठेवतात.
    काम काय?
    अत्यंत अवघड कम्प्युटर सिस्टिम वापरून, ब्रेनस्टॉर्म करून एक प्रक्रिया तयार करायची आणि ती अधिकाधिक सुलभ पद्धतीनं काम करेल असं पहायचं. अशी प्रक्रिया जी कारखान्यातला माल आपल्या मॉलमधे पोहचवते.
    काही लॉजिस्टिशियन तर नैसर्गिक आपत्तीत निर्माण झालेले ढिगारे उपसून पुन्हा काम सुरळीत करण्यासाठी मदत करतात!
    संधी कुणाला?
    आयटीत काम करणा:या, लेबर लॉची माहिती असणा:या ते थेट डिझास्टर मॅनेजमेण्ट शिकलेल्या अनेकांना यात संधी मिळू शकते!
     
    कम्प्युटर नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर
     
    येत्या काळात सुमारे 3क् टक्के वेगानं जे क्षेत्र वाढेल त्यातलं हे एक काम. जितकी अॅण्टीव्हायरस यंत्रणा तगडी, त्याहून हुशार असतात हॅकर. त्यांनी आपला डाटा चोरू नये, आपली टेक्नॉलॉजी प्रोटेक्ट करता यावी, माहिती सुरक्षा चोख करायची यासाठी हे कम्प्युटर नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर काम करतील. सरकारी कार्यालये, आर्मी, दवाखाने ते अगदी छोटय़ा कंपन्या सगळीकडे असा कुणीतरी नेटवर्क नियंत्रक लागणारच!
    काम काय?
    कार्यालयातील डे टू डे कम्प्युटर यंत्रणा उत्तम काम करतेय का यावर लक्ष ठेवणं, त्यात सुधारणा करणं, आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणं आणि काही धोका झालाच तर त्यातून बाहेर पडणं हे याचं काम.
    संधी कुणाला?
    कम्प्युटर इंजिनिअर, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग केलेल्यांना उत्तम संधी!
     
    चीफ लिसनिंग ऑफिसर
     
    सोशल मीडिया मॅनेजरच्या पुढची ही पायरी- चीफ लिसनिंग ऑफिसर!
    आपल्या ब्रॅण्डविषयी बोलत राहणं, सतत चर्चेत ठेवणं, पॉङिाटिव्ह इमेज तयार करणं हे झालं एक काम. आता त्याच्या पुढचं काम ग्राहक काय म्हणतात ते समजून घेणं!
    तेच हे लिसनिंग.  म्हणजे काय, तर आपला ग्राहक काय म्हणतो हे ऐकून त्याप्रमाणो आपल्या मॅसेजिंगमधे सुधारणा करत जाणं!
    काम काय?
    विविध स्तरावर आपल्या प्रॉडक्टविषयी होणारी चर्चा, इतर प्रॉडक्टविषयी होणारी चर्चा ऐकून त्याप्रमाणो निर्णय घेत आपल्या प्रॉडक्टविषयीच्या कम्युनिकेशनमधे बदल करणं. 
    संधी कुणाला?
    जाहिरात, कम्युनिकेशन, पत्रकारिता आणि भाषा या क्षेत्रत काम करणा:यांसह आयटी आणि मार्केटिंगवाल्यांनाही यात संधी मिळू शकते! अट एकच, कान जागा हवा!
     
     
    फ्रण्ट एण्ड इंजिनिअर
     
    आपण आपल्या आवडत्या वेबसाइटवर जातो. तिथं मधेच एखादं दुसरंही पेज दिसतं. ते पेजही अॅट्रॅक्टिव्ह असतं. आपण वेबसाइटवर गेल्या गेल्या जे दिसतं ते कुणी ना कुणी डिझाइन केलेलं असतं. ते डिझाइन करणा:या माणसांना म्हणतात फ्रण्ट एण्ड इंजिनिअर किंवा फ्रण्ड एण्ड वेब डेव्हलपर!
    फ्युचर जॉब म्हणून ज्या कामांची सध्या गणना होते त्यात हे काम आघाडीवर आहे. भरपूर पगार आणि भरपूर काम अशी ही संधी!
    काम काय?
    सध्या आपण वेबसाइट फक्त वाचतो. पुढं पुढं त्या अधिक इण्टरॅक्टिव्ह होत जातील. ते इंटरअॅक्टिव्ह करणं, वेबसाइटला भेट देणा:याला एका क्लिकवर अनेक गोष्टी भेटवणं आणि त्यासाठी युजर फ्रेण्डली वेबपेज बनवत राहणं हे ते काम!
    संधी कुणाला?
    वेब डिझायनर असलेल्या, कम्प्युटर अॅप्लिकेशन माहिती असणा:यांना !
     
    गेमिफिकेशन डिझायनर
    मोबाइल गेम म्हणजे आपला जीव की प्राण. यापुढच्या काळात तर या गेम्सचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी ते थेट अपंग लोकांना माहिती देण्यासाठीही केला जाईल. खरेदी-विक्रीचे व्यवहारसुद्धा या गेमद्वारे होतील असं म्हणतात. त्यासाठी लागतील गेम तयार करणारे म्हणजेच गेम डिझायनर. पण हे साधेसुधे गेम डिझायनर नाहीत, तर डॉक्टर जसे त्यांच्या क्षेत्रत तज्ज्ञ असतात तसेच हेसुद्धा माणसांच्या जगण्यात काही मूलभूत सुधारणा व्हावी, स्ट्रेस कमी व्हावा म्हणून ते वेगळ्या प्रकारचे गेम डिझाइन करतील.
    काम काय?
    नुस्ते मनोरंजनपर गेम डिझाइन करणं हेच त्यांचं काम नाही, तर हे डिझायनर थेरपिस्टही असतील. अनेक लोकांचा स्ट्रेस कमी व्हावा, मनशांतीसह वर्तन सुधारणा व्हावी यासाठी ते गेम तयार करतील.
    संधी कुणाला?
    गेम डिझाइन हे तंत्र म्हणजे वेब डेव्हलपिंग, अॅण्ड्रॉईडचं ज्ञान आणि वर्तन अभ्यास असा दुहेरी रस असणा:यांना यात संधी!
     
    मीडिया रिमिक्सर
    डीजे-व्हीजे म्युङिाक मिक्स करतात हे तर आपल्याला माहिती आहेच. पण यापुढे मार्केटिंग, जाहिराती ते थेट लगAसमारंभ यासाठीही हे मीडिया रिमिक्सर काम करतील. फक्त म्युङिाक नाही, तर ऑडिओ, व्हिडीओ, इमेज याचंही रिमिक्स करणारे हे तज्ज्ञ.
    काम काय?
    इन्स्टॉलेशनकडे एक आर्ट म्हणून आता पाहिलं जातं. त्याचप्रमाणो मार्केटिंग ते अगदी लगAातला एखादा करमणूकपर कार्यक्रम यासाठीही विविध ऑडिओ-व्हिडीओ वापरले जातात. या रिमिक्सरचे काम हेच, गरजेप्रमाणो विविध मीडिया वापरून एक स्पेशल इन्स्टॉलेशन इफेक्ट देणं!
    संधी कुणाला?
    या क्षेत्रत हायली क्रिएटिव्ह लोकांनाच संधी आहे. सगळ्या मीडिया नीट वापरता येणं तर महत्त्वाचंच पण त्यापेक्षाही क्रिएटिव्हिटी हवी. ऑडिओ-व्हिडीओ, फोटोग्राफी या क्षेत्रत काम करणा:यांना यात वाव आहे.
     
    ऑनलाइन रिव्ह्यूअर
    एखाद्या गावी जायचं असो, तिथले हॉटेल रिसॉर्ट पहायचे असो, आपण एकदा ऑनलाइन चेक करतो. तिथं ढिगानं माहिती असते, रिव्ह्यू असतात; पण त्यातलं खरं किती आणि मार्केटिंगवालं किती कळत नाही. ते कळून त्यातून अचूक माहिती देण्याचं काम हे ऑनलाइन रिव्ह्यूअर करतात.
    काम काय?
    ऑनलाइन आलेल्या माहितीच्या महापुरातून आपली नाव नीट पैलतीरी नेत योग्य माहिती देणं. ती माहिती जाहिरात म्हणूनही लिहून घेणं, चुकीच्या माहितीचं योग्य शब्दात उत्तर देणं. मुख्य म्हणजे ऑनलाइन आपल्या कंपनीविषयी जे बरंवाईट लिहिलं जाईल त्यावर चेक ठेवणं.
    संधी कुणाला?
    तंत्रज्ञानाचे किडे ते भोचकपणा अंगी असलेले कुणीही खरंतर हे काम करू शकतं. पण आयटीवाल्या मात्र क्रिएटिव्ह भेज्यांना स्कोप जास्त.
     
    रोबोट कौन्सिलर
    माणसांचं कौन्सिलिंग करतात पण रोबोटचं कौन्सिलिंग, जरा नवीनच प्रकरण आहे. पण येत्या काळात जसा रोबोटचा वापर वाढेल तसतसा मानवी जगण्यातला त्यांचा प्रभावही वाढेल. लोक घरकामाला माणसं ठेवण्याऐवजी सरळ रोबोट ठेवू लागतील. पण कुठला रोबोट कुणी घ्यायचा हे ठरवायचं कसं, ते कोण सांगणार?  त्यासाठीच हे रोबोट कौन्सिलर नावाचं एक नवीन काम.
    काम काय?
    ज्यांना रोबोट विकत घ्यायचा त्यांचं काम समजून घेऊन त्याप्रमाणो त्यांना रोबोट सुचवायचा. त्यांच्या गरजेप्रमाणं रोबोट मिळत नसेल तर त्याप्रमाणो रोबोट शोधून द्यायचा. कस्टमर सव्र्हिस देण्याचंच हे एक वेगळं काम.
    संधी कुणाला?
    सोशल कौन्सिलिंग, सोशल वर्क करणा:यांना, टेक्निकल किडे असणा:यांना आणि सेल्स-मार्केटिंगमधे रस असणा:यांना या क्षेत्रत संधी असेल.
     
    ईमेल मार्केटर
    जमाना ईमेलचा आणि प्रचाराचा आहेच. इतके दिवस फोनवरून मार्केटिंग व्हायचं, आता मेलवरून होणार. आणि असं मार्केटिंग करणा:यांना म्हणतात ईमेल मार्केटर. दुस:यासाठी असं उक्तं काम घेऊन ते ईमेल मार्केटिंग करतात.
    काम काय?
    ऑनलाइन ईमेल जाहिराती म्हणून पाठवणं, पण त्या जाहिराती न वाटणं असं काम करणं. ईमेल मार्केटिंगच्या नवा तंत्रचा आता कुठं इफेक्टिव्हली वापर सुरू झाला आहे.
    संधी कुणाला?
    पब्लिक रिलेशन, पत्रकारिता, मार्केटिंग या क्षेत्रतल्यांना विशेष संधी.
     
    प्रमोशनल व्हिडीओ मेकर
    व्हिडीओ मेकिंग हे काही नवीन काम नाही. पण प्रमोशनल व्हिडीओ तोही काही सेकंदाचा तयार करणं हे एक नवीन आव्हानात्मक काम आहे. नोकरी आणि फ्री लान्सिंग अशा दोन्ही टप्प्यात हे काम करता येतं.
    काम काय?
    अनेक कंपन्या आपल्या ब्रॅण्डची आणि कंपनीचीही माहिती आता व्हिडीओने देतात. ते व्हिडीओ यूटय़ूबवर टाकतात. असे कमी सेकंदाचे पण अत्यंत आकर्षक व्हिडीओ तयार करणं हे खूप स्किलचं काम आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम इथंही हे व्हिडीओ पोस्ट केले जातात. ते व्हिडीओ तयार करणं हेच त्यांचं काम.
    संधी कुणाला?
     व्हिडीओ शूटिंग येणारे, एडिटिंग आणि फिल्म मेकिंगची माहिती असणारे हे काम करू शकतात.

मंगळवार, ५ मे, २०१५

राष्ट्रीय इन्शुरन्स अकॅडमी पुणे येथे विविध पदाच्या 5 जागा/ राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंन्द्र पुणे येथे विविध पदांची भरती/ जिल्हा परिषद, जालना येथे विविध पदाच्या 73 जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कर सहायक पदांच्या 598 जागा


job logo साठी प्रतिमा परिणाम

  महाराष्ट्र वैभव- करियर न्यूज


 



राष्ट्रीय इन्शुरन्स अकॅडमी पुणे येथे विविध पदाच्या 5 जागा
राष्ट्रीय इन्शुरन्स अकॅडमी, पुणे येथे विविध विभागात अकॅडमिक असिसटंन्स (ग्रेड -1)-(4 जागा), अकॅडमिक अटेन्डन्स (स्थापत्य) (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2015 आहे. अधिक माहिती www.niapune.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंन्द्र पुणे येथे विविध पदांची भरती
राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र पुणे येथे ऑफिसर 'डी' (ॲडमिनीस्ट्रेशन) (1 जागा), ऑफिसर 'बी' (ॲडमिनीस्ट्रेशन) (1 जागा), ऑफिसर 'ए' (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांन कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2015 आहे. ही भरती सरळ सेवेतून अथवा प्रतिनिधी (डेप्युटेशनवर ) म्हणून करण्यात येणार आहे. अधिक माहिती http://www.nccs.res.in या संकेतस्थळवर उपल्पब्ध आहे.

जिल्हा परिषद, जालना येथे विविध पदाच्या 73 जागा
जिल्हा परिषद, जालना येथे कृषि अधिकारी (1 जागा), पर्यवेक्षिका (6 जागा), औषध निर्माण अधिकारी (4 जागा), वरिष्ठ सहाय्यक लेखा (1 जागा), आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी (26 जागा), आरोग्य सेवक (महिला) (12 जागा), ग्रामसेवक (कंत्राटी) (13 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), विस्तार अधिकारी (पं) (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) (2 जागा), कनिष्ठ सहाय्यक (5 जागा), विस्तार अधिकारी (सां) (5 जागा) या पदाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख विविध पदानुसार 27, 30 एप्रिल व 5 आणि 10 मे 2015 आहे. अधिक माहिती http://www.jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कर सहायक पदांच्या 598 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट - क संवर्गातील कर सहायक (598 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मे 2015 आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादीत, मुंबई येथे वाहन चालक पदाच्या 7 जागा
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादीत, मुंबई मुख्यालयासाठी वाहन चालक (7 जागा) या पदाकरिता विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 18 एप्रिल 2015 रोजीच्या सकाळ, लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विविध पदाच्या 37 जागा
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विविध पदाच्या 37 जागासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2015 आहे. अधिक माहिती www.pdkv.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


मिरा भाईंदर महानगरपालिका येथे लघुटंकलेखन पदाच्या 4 जागा
मिरा भाईंदर महानगरपालिका येथे कंत्राटी पद्धतीने लघुटंकलेखन (मराठी) (4 जागा) या पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखती दिनांक 13 मे 2015 रोजी घेण्यात येणार आहेत. यासंबंधीची जाहिरात 17 एप्रिल 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक प्राध्यापक पदांच्या 16 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र शिक्षण सेवा (महाविद्यालयीन शाखा) (गट-अ) (अपंग भरती) (16 जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मे 2015 आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

माझगांव डॉक लिमिटेड, मुंबई येथे उप महाव्यवस्थापक पदाच्या 3 जागा
माझगांव डॉक लिमिटेड, मुंबई येथे उप महाव्यवस्थापक (3 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 16 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बुधवार, २२ एप्रिल, २०१५

हॉट समर कूल स्टायलिंग

हॉट समर कूल स्टायलिंग

vv18नेहमीची जाडजूड जीन्स नको वाटतेय? सनकोट किती 'ओल्ड फॅशन' दिसतोय पण पर्याय काय? सनग्लासेसची लेटेस्ट स्टाइल कोणती? उन्हापासून बचाव तर हवा पण स्टाइल भी चाहिये बॉस! समर स्टायलिंगचे कूल फंडे...
'काय उन्हाळा आहे यार! ही जीन्स नको वाटतेय अगदी. पण रोज सलवार कमीज घालून तर नाही ना बाहेर जाऊ शकत.. सवयच नाही तशी. त्याचा आणखी त्रास व्हायचा..' 'बघ ना गं!.. आणि या अशा झळा लागतायत की, स्कार्फ तोंडभर गुंडाळावा लागतो. त्यामुळे अजूनच उकाडा !' भर दुपारच्या शांत वेळी. कॉलेजच्या वाटेवर, बसमध्ये, गाडीवर, ट्रेनमध्ये किंवा कुठल्याही नाक्यावर हे असे वैतागवाणे डायलॉग्ज दोन तरुण मैत्रिणींमध्ये झडू शकतात. या डायलॉग्जमधले मुद्दे जेन्युएन आहेत, पण जो नाइलाज झाल्याचा टोन आहे ना.. तो सुधारण्यासाठी हा लेख. उन्हाळ्यात प्रोटेक्शनच्या बरोबरीनेच स्टायिलग कसं करता येईल याच्या काही खास टिप्स..
vv15सुरुवात करूया स्कार्फपासून
उन्हाळ्यात बाहेर पडताना स्कार्फ मस्ट आहे. पण तो तोंडभरच गुंडाळला पाहिजे असा कुठेही नियम नाही. विशेषत मुंबईच्या वातावरणात उन्हाच्या चटक्याबरोबर घामाच्या धाराही नखशिखांत भिजवत असतात. त्यामध्ये हा दुहेरी- तिहेरी स्कार्फ जीव गुदमरून टाकतो. हाच स्कार्फ मग गरम झालं की गळ्याभोवती लूज सर्कल करून घेऊ शकता. डोक्यावरून घ्यायचा असेल तेव्हा, आधी डोक्यावरून अलगद घेऊन त्याच्या एका टोकाला सलसर गाठ बांधून दुसरं टोक त्या गाठीतून घाला आणि तयार झालेलं लूप हलकेच वर ओढा. हा लुक खूपच छान दिसतो आणि कम्फर्टेबलपण असतो. उन्हाळ्यात वेगवेगळे बन्स किंवा बंधानाज केसाला गुंडाळून एक मस्त लुक आणता येतो.
vv16हॉट हॅट हिट
हॅटची फॅशन आपल्याकडे रोजच्या धकाधकीत करणं शक्य नाही. कारण दुचाकीवर, बसमध्ये किंवा गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये डोक्यावरची हॅट सांभाळणं म्हणजे तशी कसरतच. पण तुम्ही ट्रिपला जाणार असाल किंवा फ्रेंड्सबरोबर ब्रंच पार्टीला जायचं असेल तर स्कार्फऐवजी हॅटचा पर्याय नक्की ट्राय करा. हॅटमुळे एक तर उन्हापासून चांगलं संरक्षण मिळतं आणि हॅटची फॅशन तुमचा लुक एकदम बदलून टाकते. कॅज्युअल वेअरवर हॅटचं कॉम्बिनेशन परफेक्ट मॅच होतं. एखाद् दोन हॉट हॅट आपल्याकडे उन्हाळ्यासाठी असल्याच पाहिजेत.
vv17सन ग्लासेस
उन्हाळा स्टायलिश करायचा असेल तर सनग्लासेसना पर्याय नाही. सध्या अनेक प्रकारचे सन ग्लासेस उपलब्ध आहेत. सध्या ग्लासेसचा राउंड शेप फॉर्मात आहे. याशिवाय स्वेअर, ओव्हल, कॅट्स आय शेप अशा वेगवेगळ्या आकारांतदेखील गॉगल्स मिळतात. चेहऱ्याला सूट होईल असा शेप निवडावा. पण रस्त्यावरच्या स्वस्त गॉगलपासून थोडं सावधान. त्या काचेचा भरवसा नसतो. त्यामुळे डोळ्यांचं संरक्षण होण्याऐवजी डोळ्यावर ताणच यायचा. यूव्ही प्रोटेक्टेड लेन्स बघूनच गॉगलची खरेदी करणं चांगलं. कलरफुल फ्रेम्ड सनग्लासेसचा ट्रेण्ड सध्या आहे. कलर्ड ग्लासेसमध्ये डोळ्यांना मानवेल, त्रास होणार नाही, असाच काचांचा रंग असावा. फ्रेमचा रंग मात्र तुम्ही तुमच्या बोल्डनेसनुसार कुठलाही निवडू शकता. अगदी व्हाइट फ्रेमपासून नियॉन कलरच्या फ्रेम्सही बाजारात आल्या आहेत. ओव्हरसाइझ गॉगलची फॅशन या सीझनमध्ये अजूनही चलतीत आहे. याशिवाय एव्हिएटर सनग्लासेसही ट्रेण्डमध्ये आहेत. पण कॅट आय फ्रेम आणि बटरफ्लाय फ्रेम ही सनग्लासेसमधली हॉट सिलेक्शन असू शकतात.
ओव्हरकोट्स बाय बाय
सनकोट किंवा ओव्हरकोट्सची फॅशन आता आउट डेटेड झाली आहे. ते पोल्का डॉट्स किंवा फुलाफुलांचे सफेद सनकोट्स घेण्याऐवजी त्याचा थोडा स्टायलिश अवतार.. कॉटन जॅकेट घेऊ शकता. जॅकेट किंवा श्रग कॉटनचा आणि अगदी पातळ असला की झालं. कुठलाही ट्युनिक, टीशर्ट आणि हे फंकी जॅकेट हे कोम्बो फारच उत्तम दिसेल. सध्या वेगवेगळ्या नेट जॅकेट, होजिअरी जॅकेटची चलती आहे. बांद्रा लिंकिंग रोड, फॅशन स्ट्रीट, पुण्यात फग्र्युसन रोड इत्यादी ठिकाणी अशी जॅकेट्स उपलब्ध आहेत. यांची किंमतदेखील २०० ते ५०० रुपयांच्या रेंजमध्ये आहे. त्याचबरोबर डेनिम जॅकेट्ससुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. अशी जॅकेट्स दिसायला तर कूल दिसतीलच, पण त्याचबरोबर उन्हापासूनही रक्षण करतील. फक्त ती जाड असतील तर उकाडय़ाचा त्रास होऊ शकतो.
नो डेनिम्स आणि नो जॉर्जेट
जीन्सशिवाय नो ऑप्शन असं म्हणणाऱ्या कितीतरी जणी उन्हाळ्यात जीन्समुळे त्रस्त झालेल्या दिसतात. जीन्सऐवजी होजिअरी, कॉटन मटेरियलचे पाजामा, धोती स्टाइल पाजामा किंवा पलाझो वापरू शकता. यावर कॉमन गर्ली टॉप न घालता होजिअरी मटेरियलमधील बॉइज टीशर्ट किंवा गंजी टॉप घालू शकता. परफेक्ट फंकी समर लुक मिळेल. ब्लॅक शेडमधले कपडे उन्हात जाताना नकोतच आणि जॉर्जेट मटेरियल्सना निदान उन्हाळ्यात तरी राम राम ठोकायला हरकत नाही.
जीन्स ऐवजी कुलॉट्स हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. हे कुलॉट्स नी लेन्थ किंवा काफ लेन्थपर्यंत असतात. कुलॉट्स घातल्यावर स्कर्ट सारखा लुक आपल्याला मिळतो. कुलॉट्स पलाझो सारखे दिसत असल्यामुळे कन्फ्युजन होण्याची शक्यता असते . पण कुलॉट्स हे पालाझोजपेक्षा घेरदार असतात.
vv19फंकी सॉक्स
उन्हाळ्यात आपल्या पायांची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं असतं. विशेषत भर उन्हात बाहेर जाताना सॉक्स मस्ट. पण कॉमन सॉक्स वापरण्याऐवजी वेगवेगळ्या िपट्र्स असलेले सॉक्स, निऑन कलर्ड सॉक्स, बोल्ड पिट्र्सचे सॉक्स खूप उठून दिसतील. शॉर्ट लेन्थ कपडय़ांसाठी म्हणजे केप्रीज, स्कर्ट, शॉर्ट्स, कुलॉट्स घालून जाणार असाल तर स्टॉकिंग्ज घालू शकाल.

छायाचित्र: चिन्मय आपटे, मॉडेल : मधुरा गोडबोले
सौजन्य : त्रिवेणी एथनिक्स

प्राची परांजपे - viva.loksatta@gmail.com
सभार - लोकसत्ता

शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

उस्मानाबाद येथे जिल्ह्यांसाठी सैन्यभरती मेळावा/ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील प्राध्यापक पदाच्या 117 जागा/ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील विविध विषयांच्या प्राध्यापक पदाच्या 117 जागा/ लोकसभा सचिवालय येथे सुरक्षा साहाय्यक पदाच्या 12 जागा/ ओएनजीसी, मुंबई येथे पदाच्या 205 जागा / न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 128 जागा/ सीमा सुरक्षा दला मध्ये कॉन्स्टेबल (जीडी) पदाच्या 346 जागा

job logo साठी प्रतिमा परिणाम

  महाराष्ट्र वैभव- करियर न्यूज




उस्मानाबाद येथे 8 ते 18 एप्रिल पर्यंत पाच जिल्ह्यांसाठी सैन्यभरती मेळावा
उस्मानाबाद येथे सैन्यभरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, पुणे या पाच जिल्ह्यांसाठी हा मेळावा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात येत आहे. दि. 8 एप्रिल रोजी पुणे, 9 एप्रिल रोजी लातूर, दि. 10 व 11 एप्रिल रोजी उस्मानाबाद, दि. 12, 13 व 14 एप्रिल रोजी अहमदनगर, दि 15, 16 व 17 एप्रिल रोजी बीड, दि. 18 एप्रिल रोजी माजी सैनिकांचे पाल्य, युद्ध विधवांचे पाल्य आदींच्या साठी सैन्य भरती प्रक्रिया होईल. या मेळाव्यात जवान (जनरल ड्युटी), जवान (तांत्रिक), जवान (क्लर्क/एसकेटी), जवान (नर्सिंग असिस्टंट) आणि जवान (ट्रेडसमन) ही पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी या सैन्यभरती मेळाव्यास उपस्थित रहावे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील विविध विषयांच्या प्राध्यापक पदाच्या 117 जागा
वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभाग अंतर्गत वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील विविध विषयांचे प्राध्यापक (35 जागा), सहयोगी प्राध्यापक (82 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दि 8 मे ते 28 मे 2015 या कालावधीत अर्ज करावे. यासंबंधीची जाहिरात 9 एप्रिल 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदाच्या 96 जागा
भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदाच्या 96 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 9 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sbi.co.in किंवा www.statebankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लोकसभा सचिवालय येथे सिक्युरिटी असिस्टंट ग्रेड-2 (सुरक्षा साहाय्यक) पदाच्या 12 जागा
लोकसभा सचिवालय येथे सिक्युरिटी असिस्टंट ग्रेड-2 (सुरक्षा साहाय्यक) (12 जागा) या पदासाठी माजी सेनादल कर्मचाऱ्यांमधून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मे 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 7 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.loksabha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ओएनजीसी, मुंबई येथे पदाच्या 205 जागा
ओएनजीसी, मुंबई येथे विविध विद्याशाखेच्या अ-I (72 जागा), अ-II (133 जागा) स्तरावरील नियमित पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 2 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 128 जागा
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 128 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 2 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.npcilcareers.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सीमा सुरक्षा दला मध्ये कॉन्स्टेबल (जीडी) पदाच्या 346 जागा
सीमा सुरक्षा दला मध्ये स्पोर्टस् कोटाच्या अनुसार महिला व पुरुष खेळाडूंची कॉन्स्टेबल (जीडी) (346 जागा) पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस आहे. यासंबंधीची जाहिरात 4 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.bsf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मंगळवार, ३१ मार्च, २०१५

10 वी व 12 वी नंतर काय? भाग 2

 10 वी व 12 वी नंतर काय? भाग 2

तरीही विद्यर्थ्यांनी शक्यतो १० वी नंतर जरी डिप्लोमाला किंवा व्यावसायीक क्षेत्राची नीवड केली तरी बाहेरुन १२ वी परीक्षा पास करावी.
 
10 वी नंतर खालील दिलेल्या क्षेत्रां पैकी निवड करू शकता.

अभियांत्रिकी पदविका, पदवी आणि पदव्युत्तर स्तरांवरील शिक्षणाद्वारे ऑटोमोबाईल संशोधन व विकास कार्यात सामील होता येईल
ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदविका
कालावधी - तीन वर्षे
ड्राफ्टमन (सिव्हिल)
कालावधी - दोन वर्षे
प्रवेश परीक्षा
ड्राफ्टमन (मॅकेनिकल)
कालावधी - दोन वर्षे
आर्किटेक्‍चर असिस्टंट
कालावधी - दोन वर्षे (आयआयटी सर्टिफिकेट)
इलेक्‍ट्रिशियन
कालावधी - दोन वर्षे (आयआयटी सर्टिफिकेट)
इलेक्‍ट्रॉनिक्‍स मॅकेनिक
कालावधी - दोन वर्षे
इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी ऍण्ड इलेक्‍ट्रॉनिक
सिस्टम मेन्टेनन्स -
कालावधी - दोन वर्षे
इन्स्ट्रुमेंट मॅकेनिक -
कालावधी - दोन वर्षे (आयटीआय सर्टिफिकेट)
रेडिओ ऍण्ड टीव्ही मॅकेनिक -
कालावधी - दोन वर्षे
रेडिओ ऍण्ड टीव्ही मॅकेनिक -
कालावधी - एक वर्ष
रेफ्रिजरेशन ऍण्ड एसी मेकॅनिक
कालावधी - एक वर्ष
प्रॉडक्‍शन ऍण्ड मॅन्युफॅक्‍चरिंग सेक्‍टर
कालावधी - दोन वर्षे
ऑटो इलक्‍ट्रिशियन
कालावधी - एक वर्ष
कॉम्प्युटर हार्डवेअर
कालावधी - एक वर्ष
स्टील फॅब्रिकेशन
कालावधी - एक वर्ष
फॅशन
टेक्‍स्टाईल डिझाईनिंग
कालावधी - एक वर्ष (आयटीआय सर्टिफिकेट, पॉलिटेक्‍निक)
गारमेंट फॅब्रिकेशन टेक्‍नॉलॉजी
कालावधी - तीन वर्षे
शिक्षण - दहावी, सीईई
--------------
रोजगाराभिमुख कोर्सेस
ऍडव्हान्स टूल ऍण्ड डाय मेकिंग
कालावधी - दोन आठवडे
पात्रता - आयटीआय व किमान एक वर्ष औद्योगिक अनुभव
संधी कोठे? - केंद्र व राज्य सरकारी संस्थेत नोकरी, खासगी औद्योगिक क्षेत्रात विपुल संधी; तसेच स्वयंरोजगारासाठी फायदेशीर
ऍडव्हान्स वेल्डिंग
कालावधी - एक आठवडा
इलेक्‍ट्रिकल मेन्टेनन्स
कालावधी - एक आठवडा
इलेक्‍ट्रॉनिक्‍स मेन्टेनन्स
कालावधी - दोन आठवडे
हिट इंजिन
कालावधी - दोन आठवडे
हायड्रोलिक्‍स ऍण्ड न्यूमॅटिक्‍स
कालावधी - दोन आठवडे
इंडस्ट्रिअल केमिस्ट्री
कालावधी - चार आठवडे
मशिन टूल मेन्टेनन्स -
कालावधी - दोन आठवडे
मेट्रोलॉजी ऍण्ड इंजिनिअरिंग इन्स्पेक्‍शन
कालावधी - एक आठवडा
मायक्रो कॉम्प्युटर किंवा इंडस्ट्रिअल कंट्रोल्स
कालावधी - दोन आठवडे
प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन
कालावधी - दोन आठवडे
टूल डिझाईन
कालावधी - चार आठवडे
----------------
अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल
मॅकेनिकल रिपेअर ऍण्ड मेन्टेनन्स ऑफ हेवी व्हेईकल्स
कालावधी - एक वर्ष
पात्रता - दहावी
मॅकेनिकल रिपेअर ऍण्ड मेन्टेनन्स ऑफ लाइट व्हेईकल्स
कालावधी - एक वर्ष
पात्रता - दहावी
मॅकेनिकल रिपेअर ऍण्ड मेन्टेनन्स ऑफ टू व्हिलर
कालावधी - सहा महिने
पात्रता - दहावी
मेकॅनिक (डिझेल)
कालावधी - एक वर्ष
पात्रता - दहावी

मेकॅनिक (मोटर व्हेईकल)
कालावधी - दोन वर्षे
पात्रता - दहावी

मेकॅनिक (ट्रॅक्‍टर)
कालावधी - एक वर्ष
पात्रता - दहावी
---------------
फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा...
अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका.
पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा.
विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी. उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.
अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या.
अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा.
इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा.
काही महाविद्यालयांमध्ये प्रश्‍नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्‍न असतात. अशा प्रश्‍नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा.
बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा.
- शंकर बागडे
---------------
काही महत्त्वाची संकेतस्थळे
1) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन.
(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी)
www.dte.org.in
2) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी)
www.dmer.org
3) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी)
www.dvet.gov.in
4) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ
www.unipune.ac.in
5) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई
आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी)
www.iitb.ac.in
6) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) "एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण
www.aipmt.nic.in
7) एनडीए प्रवेश परीक्षेसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)
www.upsc.gov.in
(लष्करात अधिकारी म्हणून जाण्यासाठी बारावीनंतर "यूपीएससी‘ची एकमेव परीक्षा)

रविवार, २९ मार्च, २०१५

10 वी व 12 वी नंतर काय? भाग 1


 10  वी व 12 वी नंतर काय?  भाग 1

करिअर म्हणजे केवळ आर्टस्‌ कॉमर्स किंवा बी.ई, एम.बी.बी.एस. नव्हे तर व्यक्तिच्या जीवनात प्रगतीच्या संधी असणारा व्यवसाय असतो. यशस्वी करिअर घडवण्यासाठी अनेक घटक महत्वाचे असतात. यात शिक्षण, आपला दुष्टीकोण, आपल्यातली कौशल्ये, सवयी, कुवत हे सारे घटक महत्वाचे असतात. केवळ दहावी, बारावीच्या मार्कवर करिअरची दिशा न ठरवता व कशाला जास्त संधी आहेत असा विचार न करता आपली आवड व कुवती नुसार करिअर निवडला तर त्यात यशस्वी होता येईल व पैसा प्रसिद्धी समाधान आनंद सर्व काही मिळते.
करिअर निवडीसाठी शिक्षण क्षेत्र महात्वाच ठरत.त्यामुळे दहावी किंवा बारावी जिथे आपल्याला निर्णय घ्यावयाचे असतात तिथे स्वत:च अवलोकन किंवा मुल्यमापन/अभिक्षमता व बुद्धीमत्ता मापन चाचणी  करणे महत्वाचे असते.    कोणते करियर योग्य ठरेल हे तपासण्यासाठी विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक मोजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध चाचण्या आहेत. अनेक मानसोपचार तज्ज्ञ या चाचण्या करतात. बुद्ध्यांक अचूक नसला तरी त्याचा मार्गदर्शनासाठी फार उपयोग होऊ शकतो. या प्रकारच्या चाचण्या घेऊन मार्गदर्शन करणार्‍या अनेक संस्था आहेत. साधारणपणे एप्रिल ते जून या महिन्याच्या कालावधीत या चाचण्या घेतल्या जातात.

तरीही विद्यर्थ्यांनी शक्यतो १० वी नंतर जरी डिप्लोमाला किंवा व्यावसायीक क्षेत्राची नीवड केली तरी बाहेरुन १२ वी परीक्षा पास करावी.
12 वी नंतर खाली दिलेल्या क्षेत्रां पैकी निवड करू शकता .
वैद्यकीय क्षेत्र
शिक्षण - एमबीबीएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि सीईटी प्रवेश परीक्षा
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका

शिक्षण - बीएएमएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका

शिक्षण - बीएचएमएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडी

शिक्षण - बीयूएमएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

शिक्षण - बीडीएस
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडीएस

शिक्षण - बीएससी इन नर्सिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र
संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र
संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

शिक्षण - डिफार्म
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश
संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - बीफार्म

शिक्षण - बीफार्म
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमफार्म

संरक्षण दलांत प्रवेशासाठी
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात.
एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात.
वयोमर्यादा : साडेसोळा ते 19 वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
***********************************************************************


अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल
शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश
संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश
शिक्षण - बीई
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस
शिक्षण - बीटेक
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी -
कालावधी - चार वर्षे
पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण
कालावधी - दोन वर्षे
पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण
***********************************************************************


कॉम्प्युटरमधील कोर्सेस साठी प्रतिमा परिणाम
कॉम्प्युटरमधील कोर्सेस
डीओईएसीसी "ओ' लेव्हल
कालावधी - एक वर्ष ऊजएअउउ
डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी
कालावधी - दोन वर्षे
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी
कालावधी - सहा महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी - तीन महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग
कालावधी - दहा महिने
इग्नू युनिव्हर्सिटी
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग
कालावधी - एक वर्ष
शिक्षण - बारावी शास्त्र
कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी - एक वर्ष
वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट
कालावधी - दोन महिने
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स
कालावधी - एक वर्ष
(फक्त मुलींसाठी)
डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग
कालावधी - दोन वर्षे
गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट
कालावधी - एक वर्ष
प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्‍स ऍण्ड ऍनिमेशन
कालावधी - एक वर्ष
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट
कालावधी - एक वर्ष
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर
कालावधी - एक वर्ष
***********************************************************************

रोजगाराभिमुख कोर्सेस
शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी
कालावधी - तीन वर्षे
पात्रता - बारावी (70 टक्के)
संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड
इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी
उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स
इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर
शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता - दहावी आणि बारावी पास
संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर
(जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग
फाउंडेशन (एनटीटीएफ)
सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस
कालावधी - एक वर्ष
फॅशन टेक्‍नॉलॉजी
कालावधी - एक वर्ष
मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस
कालावधी - तीन वर्षे
***********************************************************************

हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम
टूरिस्ट गाइड
कालावधी - सहा महिने
डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस
कालावधी - दीड वर्ष
बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग
कालावधी - तीन महिने
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन
सिस्टम (एअर टिकेटिंग)
कालावधी - एक महिना
अप्रेन्टाईसशिप
कालावधी - पाच महिने ते चार वर्षे
शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी
डिजिटल फोटोग्राफी
कालावधी - एक वर्ष
स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग
कालावधी - एक ते तीन वर्षे
सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी
कालावधी - एक ते तीन वर्षे
***********************************************************************

बांधकाम व्यवसाय
शिक्षण - बीआर्च
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक
***********************************************************************

पारंपरिक कोर्सेस
शिक्षण - बीएससी
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट
संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी

शिक्षण - बीएससी (ऍग्रो)
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र
संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन

शिक्षण - बीए
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी

शिक्षण - बीकॉम
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी

शिक्षण - बीएसएल
कालावधी - पाच वर्षे
संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा
पुढील उच्च शिक्षण - एलएलएम

शिक्षण - डीएड
कालावधी - दोन वर्षे
प्रवेश - सीईटी आवश्‍यक
संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक
पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड

शिक्षण - बीबीए, बीसीए,बीबीएम
कालावधी - तीन वर्षे
प्रवेश - सीईटी
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए

फॉरेन लॅंग्वेज
(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज,
जॅपनीज, कोरियन)
कालावधी ः बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर
कोर्सेसवर आधारित
***********************************************************************


हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग
शिक्षण - हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - पंचतारांकित हॉटेल, मॉल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये नोकरी, केटरिंग व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
डिप्लोमा इन बेकरी ऍण्ड कॉन्फेक्‍शनरी
कालावधी - दीड वर्षे
डिप्लोमा, क्राफ्ट कोर्स इन फूड प्रॉडक्‍शन
कालावधी - दीड वर्षे

रविवार, २२ मार्च, २०१५

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट मध्ये सहाय्यक प्रबंधक (विधि) पदाची जागा/ माझगाव डॉकमध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी (वित्त) पदाच्या 11 जागा/ बृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 31 जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य/ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अहमदनगर येथे विविध पदाच्या 36 जागा/ महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांच्या 182 जागा



job logo साठी प्रतिमा परिणाम

  महाराष्ट्र वैभव- करियर न्यूज






जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट मध्ये सहाय्यक प्रबंधक (विधि) पदाची जागा
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट मध्ये सहाय्यक प्रबंधक (विधि) (1 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 12 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.jnport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

माझगाव डॉकमध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी (वित्त) पदाच्या 11 जागा
माझगाव डॉक लिमिटेड मुंबई मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी (वित्त) (11 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 12 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 31 जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य 
 विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र) (11 जागा), वैद्यकीय अधिकारी (बालरोग चिकित्साशास्त्र) (20 जागा) या पदासांठी विहित नमुन्यातील अर्जासहीत 24 मार्च 2015 रोजी थेट मुलाखातीस पात्र उमेदवारांनी उपस्थित रहावे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 13 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अहमदनगर येथे विविध पदाच्या 36 जागा
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा,जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे जिल्हा व उपविभागीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेसाठी तसेच जिल्हा संनियंत्रण कक्षाकरिता कंत्राटी पद्धतीने विविध पदाच्या 36 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 15 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांच्या 182 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील सहायक संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय गट-ब, सह संचालक हिंदी/गुजराती/सिंधी साहित्य अकादमी गट-अ, सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी गट-अ (22 जागा), महिला व बाल विकास विभागातील निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था/रचना व कार्यपद्धती अधिकारी/अधिव्याख्याता/जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी/अधीकक्ष/सांख्यिकी अधिकारी गट-अ (147 जागा), मराठी भाषा विभागातील अनुवादक (मराठी) भाषा संचालनालय गट-क (13 जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2015 आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शुक्रवार, २० मार्च, २०१५

मुलाखतीला जाताना..

मुलाखतीला जाताना..

 शिक्षण पूर्ण झालं की, पोटापाण्यासाठी नोकरीचा शोध सुरू होतो. स्पर्धेच्या या युगात नोकरी मिळविण्यासाठी चांगल्या क्वॉलिफिकेशनसोबतच चांगले व्यक्तिमत्त्वदेखील आवश्यक असते. मुलाखत ही नोकरी मिळविण्याची पहिली पायरी असते. मुलाखतीला सामोरं जाताना नेमकी काळजी कोणती घ्यावी, यासाठी काही टिप्स...


यारो, नोकरी जितकी महत्त्वाची असते तितकीच महत्त्वाची असते मुलाखत. म्हणतात ना ‘फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन’ ते अगदी खरं आहे. तुम्ही मुलाखत कशी देता, मुलाखतीदरम्यान तुमची बॉडीलँग्वेज कशी असते, विचारलेल्या प्रश्‍नांना तुम्ही कशा प्रकारे उत्तरे देता इत्यादी बाबींवर नोकरी अवलंबून असते. बरेचदा डिग्री असते, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीजमध्येही आपण अव्वल असतो, मात्र नेमकी मुलाखतीत माशी शिंकते. यालाच ‘इंटरव्ह्यू मॅनर्स’ म्हणतात. तेव्हा मुलाखतीला जाताना काही टिप्स कायम लक्षात ठेवाव्या :
मुलाखतीला जाताना.... साठी प्रतिमा परिणाम


प्रत्यक्ष मुलाखतीला सामोरे जाताना उमेदवाराने घाईगर्दीने बोलण्याचे टाळावे. समोरच्या माणसांना तुमच्या गुणांची चाचपणी करण्यास वेळ द्यावा.

सूचना मिळेपर्यंत खुर्चीवर बसू नये आणि बसण्याची सूचना मिळाल्यावर, काही वेळा बसण्याचे साधन रिकामे नसते अशा वेळी टेबलावर रेलू नका.


उमेदवाराचे उत्तर व्यवस्थित, मुद्देसूद आणि आकर्षक असावे. विचारल्याशिवाय अधिक माहिती देण्याच्या भानगडीत पडू नये.


उमेदवाराने नेहमी समोरच्याला सर किंवा मॅडम अशा आदरयुक्त शब्दाने हाक मारावी.


मुलाखत चालू असताना खोकला किंवा शिंक आल्यास तोंडासमोर रुमाल ठेवावा.


मुलाखत घेणारा हास्यविनोद करीत असल्यास उमेदवाराने सहभागी होऊ नये.


मुलाखत देताना अधिकाधिक ज्ञान, क्षमता, कौशल्य सादर करण्याचा प्रयत्न करावा.


समोर बसलेल्या उमेदवाराने नेहमी समोर बसलेल्या मुख्य माणसाला उत्तर द्यावे.


मुलाखतीला जाताना पुरुषाने नेहमी काळी, नेव्ही ब्लू, ग्रे रंगाची ट्राउझर आणि सॉफ्ट कलर शर्ट, पॉलिश केलेले काळे लेदर शूज, पांढरे सॉक्स, प्लेन टाय लावून जावे. कफलिंग किंवा चेनसारखी ज्वेलरी घातली नाही तरच उत्तम. खिशात पेन किंवा प्रवासाचे तिकीट ठेवू नये.


स्त्रियांनी काळ्या, निळ्या रंगाची ट्राउझर, सॉफ्ट कलर शर्ट, सॉफ्ट कलर पंजाबी ड्रेस किंवा साडी, गडद रंगाचे मेकअप टाळावे. हेअर स्टाईलमध्ये केस चेहर्‍यावर येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. काळ्या रंगाचे शूज वापरावेत, शक्यतोवर टोकदार शूज वापरू नयेत.


मुलाखतीच्या वेळी केबिनमध्ये शिरताना घाईघाईने आत शिरू नका, संयम आणि तोल सांभाळून आत शिरावे. आतमध्ये आल्यास सर्वप्रथम पॅनलमधील सर्व सदस्यांना अभिवादन करावे.


सूचना मिळेपर्यंत खुर्चीवर बसू नये आणि बसण्याची सूचना मिळाल्यावर, काही वेळा बसण्याचे साधन रिकामे नसते अशा वेळी टेबलावर रेलू नका.


कुणीही काहीही बोललं तरी मनाचा तोल ढासळू देऊ नका.


मुलाखतीत एखादे वाक्य इंग्रजी बोलत असाल तर ते देखील अचूक बोला नाहीतर स्वत:चा पोपट करून घेऊ नका. चुकीचे बोलून तुमच्या विषयीचे मत नकारात्मक होऊ देऊ नका


उत्तर नेहमी खंबीर आणि स्पष्टपणे द्यावे. बिचकतपणे उत्तरे देणे कधीही फायद्याचे ठरणार नाही.


शक्य झाल्यास मुलाखत घेणार्‍याच्या मनाचा मागोवा घेण्याची हातोटी तुम्हाला साधता यायला हवी. तीही तोंडी आणि अतिशय थोडक्या वेळात.


महत्त्वाकांक्षी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. प्रामाणिक राहावे.


वेगळ्या पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांनी विचलित होऊ नका. रिझ्युम नेटका तयार करावा.


मोठमोठी अगडबंब भपकेबाज उत्तरं देऊन तुमच्या परीक्षकांच्या मनात गोंधळ उडवून देऊ नका, स्पष्ट व मुद्देसूद उत्तरं द्यावीत.


मुलाखत घेणार्‍यांच्या नजरेला नजर मिळवून बोलावे. अधूनमधून स्मित हास्य करायला विसरू नये.


मुलाखतीचा अगोदर सराव करावा.


यशस्वी व जिंकण्याची मनोवृत्ती ठेवावी.


मुलाखतीच्या ठिकाणी वेळेच्या आधी १५ मिनिटे पोहोचावे.


तुम्हाला काहीही सूचना मिळेपर्यंत मुलाखतीचा कक्ष सोडू नये.


जाताना आभार मानायला विसरू नका आणि एकदा जाण्यासाठी निघाल्यानंतर मागे वळून पाहू नका.


मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचल्यावर उपस्थित असणार्‍या इतर उमेदवारांशी ओळख करून घ्या. त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नांची माहिती करून घ्यावी.

मार्केटिंग स्ट्रॅटेजी चांगल्या पध्दतीने समजून घ्या. कारण तुमच्या कामातून तुम्ही कंपनीच्या प्रोग्रेससाठी काय काय करणार आहेत हे मुलाखत पॅनलला सांगण्याची गरज पडू शकत


अशाप्रकारे तयारी करून एखाद्या दक्ष सैनिकाप्रमाणे मुलाखतीसाठी जा. मनाने रीलॅक्स आणि बुद्धीने तयार राहा. मग यश तुमचेच आहे.


सोमवार, १६ मार्च, २०१५

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे वैद्यकीय सेवा परीक्षा-2015 अंर्तगत 1402 जागा/ केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे अभियंता सेवा परीक्षा-2015 अंर्तगत 475 जागा/ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे येथे विविध पदाच्या 69 जागावसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध पदाच्या 46 जागा.............

job logo साठी प्रतिमा परिणाम

  महाराष्ट्र वैभव- करियर न्यूज



केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे वैद्यकीय सेवा परीक्षा-2015 अंर्तगत 1402 जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे वैद्यकीय सेवा परीक्षा-2015 अंर्तगत वैद्यकीय अधिकारी (1402 जागा) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14-20 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे अभियंता सेवा परीक्षा-2015 अंर्तगत 475 जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे अभियंता सेवा परीक्षा-2015 अंर्तगत विविध विभागामधील अभियंता (475 जागा) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14-20 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-
---------------------------------------------------------------------------------------------------------------
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध पदाच्या 16 जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे अंर्तगत विविध पदाच्या 16 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14-20 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- ऑर्डीनन्स फॅक्टरी, देहू रोड, पुणे येथे विविध पदाच्या 22 जागा
ऑर्डीनन्स फॅक्टरी, देहू रोड, पुणे येथे विविध पदाच्या 22 जागांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14-20 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवस आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- 
 भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे येथे विविध पदाच्या 69 जागा
वरिष्ठ भूवैद्यानिक कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे येथे पिण्याच्या पाण्याचे गुणवत्तेचे संनियंत्रण करण्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळांकरिता आणि राज्य, विभाग, जिल्हास्तरीय संनियंत्रण कक्षाकरिता कंत्राटी पद्धतीने विविध पदाच्या 69 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 14 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- पर्यावरण विभाग,मंत्रालय मुंबई येथे विविध पदाच्या 6 जागा
केंद्र शासनाच्या एन्व्हिस व इतर प्रकल्पांतर्गत पर्यावरण विभाग,मंत्रालय मुंबई येथे प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक, वेब ॲडमिनिस्ट्रेटर, डाटा ऑपरेटर व टंकलेखक, लघुलेखक, विधी अधिकारी या जागा कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात सकाळ 15 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://mahenvis.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध पदाच्या 46 जागा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक व इतर पदाच्या 46 जागांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 12 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://mkv2.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेत सह/उप संचालकाच्या 6 जागा
मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेत कंत्राटी तत्वावर सह/उप संचालकाच्या 6 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 14 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mdacs.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------         सेबी मध्ये अधिकारी ग्रेड ए - माहिती प्रणाली (तांत्रिक शाखा) पदाच्या 4 जागा
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये सेबी अधिकारी ग्रेड ए - माहिती प्रणाली (तांत्रिक शाखा) (4 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 13 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sebi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------         मुंबई उच्च न्यायालयात वैयक्तिक सहाय्यक पदाच्या 13 जागा
मुंबई उच्च न्यायालयामध्ये वैयक्तिक सहाय्यक (13 जागा) यापदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2015 आहे. अधिक माहिती http://bombayhighcourt.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------           स्टील ऑथोरिट ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थीच्या 346 जागा
स्टील ऑथोरिट ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) आणि व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी (प्रशासकीय) या विभागातील विविध पदाच्या 346 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 7-13 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sail.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- आण्विक ऊर्जा शिक्षण सोसायटी मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदाच्या 48 जागा
भारत सरकारच्या आण्विक ऊर्जा विभागांतर्गत आण्विक ऊर्जा शिक्षण सोसायटी मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विविध पदाच्या 48 जागांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवस आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 7-13 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.aees.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------- केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध पदाच्या 172 जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे संचालक (पिक विकास) (2 जागा), वैज्ञानिक (रसायन शास्त्र) (4 जागा), औषध निरीक्षक (147 जागा), आर्किटेक्ट (1 जागा), प्राध्यापक (माहिती व तंत्रज्ञान) तांत्रिक (2 जागा), प्राध्यापक (स्थापत्य अभियंत्रिकी) (1 जागा), सहयोगी प्राध्यापक (माहिती व तंत्रज्ञान) तांत्रिक (1 जागा), सहाय्यक प्राध्यापक (युनानी) (14 जागा) या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 28 फेब्रुवारी-6मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------  सेंट्रल एएफए डेपो खडकी, पुणे येथे मजदूर, माळी पदाच्या 21 जागा
सेंट्रल एएफए डिपोट खडकी, पुणे येथे मजदूर (20 जागा), माळी (1 जागा) या पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्‍यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 28 फेब्रुवारी -6 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवस आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------  सेंट्रल ऑर्डीनन्स डेपो, देहू रोड, पुणे येथे विविध पदाच्या 19 जागा
सेंट्रल ऑर्डीनन्स डेपो, देहू रोड, पुणे येथे विविध पदाच्या 19 जागांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 28 फेब्रुवारी -6 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवस आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई, येथे पहारेकरी पदाच्या 13 जागा
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई, येथे पहारेकरी (13 जागा) यापदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मार्च 2015 आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 7 मार्च 2015 च्या लोकमत, लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस बोर्ड, मुंबई येथे विविध पदाच्या 19 जागा
भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस बोर्ड, मुंबई येथे सहायक प्रबंधक (राजभाषा) ग्रेड ए (6 जागा), प्रबंधक (तांत्रिक-स्थापत्य) ग्रेड बी (2 जागा), प्रबंधक (तांत्रिक-विद्युत) ग्रेड बी (2 जागा), सहाय्यक प्रबंधक (सुरक्षा) ग्रेड ए (9 जागा) या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 7 मार्च 2015 च्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे वित्त व लेखाधिकारी पदाची जागा
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे वित्त व लेखाधिकारी या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2015 आहे. अधिक माहिती www.maharashtra.inhttp://su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------   मुंबई येथे कनिष्ठ अभियंता/ निम्न श्रेणी लघुलेखक पदाच्या 2 जागा
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिमार्ण व कल्याण महामंडळ, मुंबई येथे कनिष्ठ अभियंता (1 जागा), निम्न श्रेणी लघुलेखक (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 8 मार्च 2015 च्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.msphc.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई येथे विशेष कार्यभार अधिकारी 4 जागा
भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई येथे कार्यकारी अधिकारी (4 जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 5 मार्च 2015 च्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.iitb.ac,in/jobs.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन येथे विविध पदाच्या 2 जागा
नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन येथे महाव्यवस्थापक (1 जागा), कार्यकारी संचालक (1 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवस आहे. यासंबंधीची जाहिरात 4 मार्च 2015 च्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------   बार्टी, पुणे येथे समतादूत या पदाच्या विभागनिहाय जागा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे समतादूत या पदासाठी विभागनिहाय ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 4 मार्च 2015 च्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांच्या 227 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथमवर्ग) (पूर्व) परीक्षा-2015 अंतर्गत दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथमवर्ग) (227 जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2015 आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- महापत्तन प्रशुल्‍क प्राधिकरण, मुंबई येथे विविध पदाच्या 5 जागा
महापत्तन प्रशुल्‍क प्राधिकरण, मुंबई येथे उपसंचालक (2 जागा), सहाय्यक संचालक (1 जागा), प्रोग्रामर (1 जागा), अनुभाग अधिकारी (1 जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झालेपासून 20 दिवस आहे. यासंबंधीची जाहिरात 26 फेब्रुवारी 2015 च्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात आली आहे. अधिक माहिती www.tariffauthority.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड विद्यापीठ, नांदेड येथे विविध पदाच्या 2 जागा
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड विद्यापीठ, नांदेड येथे परीक्षा नियंत्रक (1 जागा), वित्त व लेखाधिकारी (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2015 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 62 जागा
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कृषी आणि कृषी अभियांत्रिकी शाखांमध्ये विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक (62 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येते आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ मार्च 2015 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे विविध पदाच्या 14 जागा
सामान्य प्रशासन विभाग निवासी आयुक्त व सचिव यांचे कार्यालय, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे स्वागत अधिकारी/राज्यशिष्टाचार अधिकारी/संपर्क अधिकारी/उपलेखापाल (3 जागा), वरिष्ठ लिपिक (2 जागा), लिपिक टंकलेखक (2 जागा), कक्षबंध परिचारक (7 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 23 फेब्रुवारी 2015 च्या लोकसत्ता या वृत्तपत्रात आली आहे. अधिक माहिती www.maharashtrasadan.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवा पदाच्या 61 जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे भारतीय आर्थिक सेवा (6 जागा), भारतीय सांख्यिकी सेवा (55 जागा), या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 21-27 फेब्रुवारी 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध पदाच्या 240 जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे जिओलॉजिस्ट (गट-अ) (150 जगा), जिओफीजेसिस्ट (गट-अ) (40 जागा), केमिस्ट (50 जागा) या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 21-27 फेब्रुवारी 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------   पावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लि. नागपूर येथे कनिष्ठ टेक्निशयन (ट्रेनी) पदाच्या 5 जागा
पावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लि. नागपूर येथे कनिष्ठ टेक्निशयन (विद्युत) (ट्रेनी) (5 जागा) अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 21 फेब्रुवारी 2015 च्या लोकमत या वृत्तपत्रात आली आहे. अधिक माहिती www.powergridindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक (कनिष्ठ) पदाच्या 7630 जागा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील विभागीय स्तरावर चालक (कनिष्ठ) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. विभागीय पदनिहाय संख्या पुढीलप्रमाणे-
मुंबई विभाग (39), पालघर विभाग (100), रायगड विभाग (156), रत्नागिरी विभाग (231), सिंधुदुर्ग विभाग (239), ठाणे विभाग (152), कोल्हापूर विभाग (564), पुणे विभाग (751), सांगली विभाग (541), सातारा विभाग (387), सोलापूर विभाग (500), अहमदनगर विभाग (262), धुळे विभाग (415), जळगांव विभाग (122), नाशिक विभाग (546), नागपूर विभाग (347), वर्धा विभाग (71), भंडारा विभाग (174), चंद्रपूर विभाग (87),गडचिरोली विभाग (139), औरंगाबाद विभाग (265), बीड विभाग (170), जालना विभाग (112), लातूर विभाग (144), नांदेड विभाग (219), उस्मानाबाद विभाग (128), परभणी विभाग (157), अमरावती विभाग (78), अकोला विभाग (226), बुलढाणा विभाग (138), यवतमाळ विभाग (170). अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 16 फेब्रुवारी 2015 च्या लोकमत या वृत्तपत्रात आली आहे. अधिक माहिती www.mahast.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


---------------------------------------------------------------------------------------------------------------         द ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनी मध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या 246 जागा
द ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नवी दिल्ली येथे प्रशासकीय अधिकारी (श्रेणी 1) (246 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 19 फेब्रुवारी 2015 च्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात आली आहे. अधिक माहिती www.orientalinsurance.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------- केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध पदाच्या 46 जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे स्टोअर्स ऑफसर्स (20 जागा), सहायक पब्लिक प्रॉसिक्युटर्स (22 जागा), सहायक सर्व्हे ऑफीसर्स (4 जागा ) यापदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अंतिम तारीख 14 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 14 फेब्रुवारी 2015 च्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात आली आहे. अधिक माहिती http://upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


---------------------------------------------------------------------------------------------------------------
‘नोकरी शोधा’ या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘महान्यूज’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.