वेळ मॅनेज कसा करायचा हे शिकण्याआधी वेळ म्हणजे काय हे समजून घेणं
अत्यावश्यक आहे. वेळ दोन प्रकारची असते. एक असते घड्याळातली वेळ , ज्यात ६०
सेकंदांचे एक मिनिट , २४ तासांचा एक दिवस आणि ३६५ दिवसांचे एक वर्ष असते.
हा प्रकार सर्वांसाठी सारखाच असतो ; पण दुसरा प्रकार असतो रिअल टाइम , जिथे
सगळा वेळ तुलनात्मक असतो. कंटाळवाणं काम करताना एखादा तास पूर्ण
दिवसासारखा वाटतो , तर मित्रांसोबत दिवस कसा जातो , हेच कळत नाही. तुम्ही
कोणत्या प्रकारची वेळ पाळता यावर तुमचं टाइम मॅनेजमेंट अवलंबून असतं.